सांगलीत शिवसेनेचे धरणे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

सांगली - बुधगाव (ता. मिरज) येथील नळपाणी योजनेतील कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाईच्या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान, पाणी योजनेत अपहार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन जि.प.चे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.

जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदनात म्हटले आहे की, बुधगाव नळ पाणीपुरवठा योजनेसाठी नियम डावलून अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. खोदाईसाठी धरण्यात आलेला  ५९७ रुपयांचा दरही चुकीचा वाटतो. कठीण दगड लागल्याचा बनाव असल्याचे जाणवते त्याबाबत योग्य तपासणी करून त्याची माहिती द्यावी. गावातील खुदाईचा दर जि. प. पाणी योजनेसाठी वापराता येतो का ? अंदाजपत्रकातील तरतुदी पेक्षा ठेकेदाराला अधिक दर दिल आहे का ? याप्रकरणात लेखापरिक्षण नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. असा आरोप करण्यात आला आहे. त्याचे निवेदन जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. धरणे आंदोलनात बजरंग पाटील, विक्रम पाटील, बाळासो मगदूम, अवधूत पाटील सतीश खांबे, नेताजी जमदाडे, गजानन इंगळे, भरत कांबळे, उमेश माने, सुनिल आवळे, सुशांत सावंत आदी कार्यकर्ते सहभागी होते.

Web Title: sangli news shiv sena