खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र देण्याबाबत नगरपंचायतीत ठराव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

खानापूर -  नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठांची संख्या वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात उपकेंद्र आणि नंतर त्याचे विद्यापीठात रूपांतर करण्यात येणार आहे. या धोरणाला अनुसरून खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी  सन २०१३-२०१४ पासून चर्चा सुरू आहे.

खानापूर -  नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठांची संख्या वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात उपकेंद्र आणि नंतर त्याचे विद्यापीठात रूपांतर करण्यात येणार आहे. या धोरणाला अनुसरून खानापूरला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी  सन २०१३-२०१४ पासून चर्चा सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगरपंचायतीने उपकेंद्र व जागा उपलब्ध करून देण्यासाठी ठराव केला. उपकेंद्रासाठीच्या निकषानुसार नगरपंचायतीने सर्व मदत व सहकार्य देण्याचे ठरवले आहे. नगरपंचायतीत सर्वप्रथम ठराव करून पहिले पाऊल उचलले. 

खानापूर घाटमाथ्यावरील मध्यवर्ती ठिकाण आहे. घाटमाथ्यावरील मोठी बाजारपेठ आहे. खानापूर गाव विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर आहे. उपकेंद्र झाल्यास घाटमाथ्यावरती मोठी शैक्षणिक क्रांती होईल. या भागाचा भौगोलिक, आर्थिक व शैक्षणिक विकास होण्यास मदत होणार आहे. 

सर्व सुविधा उपलब्ध

  •  उपकेंद्रासाठी खानापूरमध्ये १०० एकरवर जागा.

  •  विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गालगत ठिकाण.

  •  मोठा पाझर तलाव जवळ, मुबलक पाणी उपलब्ध.

  •  टेंभू योजनेचेही पाणी येणार असल्याने अडचण नाही.

माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांनी घाटमाथ्यावरील सर्व ग्रामपंचायतींना असे आवाहन केले, त्यांनी म्हटले आहे, की उद्या (ता. एक मे) प्रत्येक ग्रामपंचायतीने आपापल्या ग्रामसभेत ‘घाटमाथ्यावरील खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे’, अशा आशयाचा ठराव करून घ्यावा. जेणेकरून उपकेंद्र  होण्यास अडचण येणार नाही. उपकेंद्र घाटमाथ्याला  वरदान ठरणारे आहे. 

निकषानुसार खानापूरमध्ये उपकेंद्र होण्यास अडचण नाही, असे सुहास शिंदे यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे  यांच्यासह विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही घेतली आहे. घाटमाथ्यावर एकाच वेळी जलक्रांती व शैक्षणिक क्रांती होण्यासाठी सकारात्मक पावले पडत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Sangli News Shivaji University sub division to Khanapur