चेंजिंग रूममध्ये महिलांचे छुप्या कॅमेऱ्याने चित्रीकरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

सांगली - शहरातील राम मंदिर चौकाजवळ असलेल्या प्राची डायग्नोस्टिक सेंटरमध्ये महिलांचे छुप्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सेंटरमधील कंपौंडर सूरज मुल्ला यास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सांगली - शहरातील राम मंदिर चौकाजवळ असलेल्या प्राची डायग्नोस्टिक सेंटरमध्ये महिलांचे छुप्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सेंटरमधील कंपौंडर सूरज मुल्ला यास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - प्राची डायग्नोस्टिक सेंटरमध्ये महिलांसाठी असलेल्या चेंजिंग रूममध्ये दुपारी एक महिला असताना तेथे एका  सिरिंजच्या बॉक्‍समध्ये मोबाईलची रिंग वाजली. त्यामुळे बॉक्‍स हलू लागल्याने महिलेने त्यात पाहिले असता त्यात मोबाईल असल्याचे दिसून आले. त्यानंतर तो मोबाईल सेंटरमधील कंपाऊंडर सूरज मुल्ला याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याने चुकून मोबाईल तेथे विसरल्याचे सांगितले; मात्र मोबाईल बॉक्‍सच्या एका बाजूस कॅमेऱ्याच्या आकाराचे चौकोनी छिद्र पाडून ठेवल्याचे दिसून  आले. त्यामुळे मोबाईल कॅमेऱ्याने चेंजिंग रूममध्ये महिलांचे छुपे चित्रीकरण करण्यात येत असल्याचे समोर आले.

माझ्या सेंटरमध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर 
तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. संशयितास पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मोबाईल कॅमेऱ्याने हा प्रकार होत असल्याने याची माहिती मला नव्हती; मात्र यापुढे    महिलांच्या सुरक्षेबाबत दक्षता घेण्यासाठी आणखी काळजी घेण्यात येईल.
-डॉ. प्रसाद चिटणीस, 

प्राची डायग्नोस्टिक सेंटर

हा प्रकार उघडकीस येताच महिलेच्या पतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने प्राची डायग्नोस्टीक सेंटरमध्ये धाव घेत संशयित मुल्लाला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल जप्त केला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुल्ला दीड  वर्षे सेंटरमध्ये काम करत आहे.

Web Title: Sangli News Shooting in the changing room with hidden cameras