श्रमिक मुक्तीदलाकडून शासन अध्यादेशाची होळी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

सांगली - शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी देण्याऐवजी त्यांच्यावर दहा हजार रूपये कर्जाचा बोजा टाकल्याच्या निषेधार्थ श्रमिक मुक्ती दलातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकांनी शासनाच्या कर्जमाफी अध्यादेशाची होळीही केली. 

विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून दुपारी मोर्चा सुरु झाला. तो जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे मुख्य प्रवेशद्वाराजवळच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जाता आले नाही. प्रवेशद्वाराजवळच शासनाच्या अध्यादेशाची होळी केली. शासन विरोधात निदर्शनेही केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे, की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याऐवजी त्यांच्या डोक्‍यावर नव्याने दहा हजाराच्या कर्जाचा भार टाकला आहे. या निर्णयातून शेतकऱ्यांच्या संपाची चेष्टाच केली गेली आहे. शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता कर्जमुक्त करून सात-बारा कोरा करावा, शेतीला सिंचनाची सोय करून देऊन कायमस्वरुपी वीजपुरवठा करावा, शेतमालाला हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रक्रिया उद्योग उभारावेत अशा मागण्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. दुष्काळ, नापिकीमुळे त्यांचे जगणे अवघड झाले आहे. शासनाने मागण्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा. निकष न ठेवता कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. आनंदराव पाटील, आण्णासाहेब पत्की, मोहनराव यादव, दिलीप पाटील, सुरेश पाटील आदी आंदोलनात सहभागी झाले.

Web Title: sangli news shramik mukati dal farmer