सांगली नगरवाचनालयात सापामुळे धावपळ

विजय पाटील
शुक्रवार, 29 जून 2018

सांगली - सांगलीच्या नगरवाचनालयात सकाळी मोठा साप आढळल्याने एकच धावपळ उडाली. ग्रंथालय परिसर हा नेहमी शांत असतो पण शांत असणाऱ्या या कार्यालयात या सापामुळे काही वेळ गोधळ निर्माण झाला होता. अखेर सर्पमित्रांनी सहा फुट असणाऱ्या धामीण सापाला जेरबंद करत नदीकाठी सोडून दिले.

सांगली शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या राजवाडा चौक येथील सार्वजनिक नगरवाचनालय आज एका सापाने धुमाकूळ घातला. अचानक वाचनालयाच्या कार्यालयात भला मोठा साप दिसल्याने पाहणाऱ्यांची बोबडीच वळली. यानंतर संपूर्ण वाचनालयात एकच गोंधळ उडाला. साप आला साप म्हणून यावेळी एकच गदारोळ सुरु झाला. त्यानंतर काही वेळातच सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले.  

सर्पमित्र मेगदीप कुदळे यांनी अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर  साडे सहा फूट लांबीची भली मोठी धामीण पकडली. त्यानंतर सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.

Web Title: Sangli News Snake found in Nagar Vachanalaya