मिरज-सोलापूर , कोल्हापूर-सोलापूर रेल्वे सोमवारपासून नियमित धावणार

संतोष भिसे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मिरज - कुर्डुवाडी-सोलापूरदरम्यान रेल्वेने घेतलेला ऐतिहासीक मेगा ब्लॉक आज संपुष्टात आला. पुणे-सोलापूर मार्गावरील रेल्वे वाहतुक आजपासून अंशतः मार्गस्थ झाली. मिरज-सोलापूर आणि कोल्हापूर-सोलापूर या गाड्या मात्र सोमवारपासूनच ( ता. 16 ) नियमित धावणार आहेत.

मिरज - कुर्डुवाडी-सोलापूरदरम्यान रेल्वेने घेतलेला ऐतिहासीक मेगा ब्लॉक आज संपुष्टात आला. पुणे-सोलापूर मार्गावरील रेल्वे वाहतुक आजपासून अंशतः मार्गस्थ झाली. मिरज-सोलापूर आणि कोल्हापूर-सोलापूर या गाड्या मात्र सोमवारपासूनच ( ता. 16 ) नियमित धावणार आहेत.

गेले पंधरा दिवस सोलापूर वाहतुक बंद ठेवल्याने प्रवाशांची खुपच गैरसोय झाली. रेल्वेलाही लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले. वाकाव-वडसिंग स्थानकांदरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. सोलापूरातून पुणे आणि मिरज मार्गांवरील बारा गाड्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये मिरज-सोलापूर व कोल्हापूर-सोलापूर एक्‍सप्रेस गाड्यांचा समावेश होता. मुंबईहून सोलापूरमार्गे दक्षिणेत जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या आकरा गाड्या मिरजसह अन्य मार्गे वळवण्यात आल्या होत्या. 

रेल्वेमार्गाचे काम पुर्ण झाल्याने ही वाहतुक आजपासून अंशतः सुरु झाली. मुंबई-बेंगलुरु उद्यान एक्‍सप्रेस, मुंबई-नागरकोयल एक्‍सप्रेस, मुंबई-त्रिवेंद्रम एक्‍सप्रेस, मुंबई-चेन्नई मेल आणि मुंबई-चेन्नई एक्‍सप्रेस या गाड्या टप्प्याटप्प्याने आजपासून सुरु करण्यात आल्या. सोलापूर-मिरज, सोलापूर-कोल्हापूर, सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्‍सप्रेस, सोलापूर-पुणे डेमू, मुंबई-विजापूर फास्ट पॅसेंजर आणि मुंबई-पंढरपूर फास्ट पॅसेंजर या गाड्या मात्र सोमवारपासूनच धावणार आहेत.

गाड्या आता 110 च्या स्पीडने
कुर्डुवाडी ते सोलापूरदरम्यान गाड्यांची गती 90 ते 100 किलोमीटर प्रतितास अशी असते. वाकाव ते माढा आणि माढा ते वडसिंग या स्थानकांदरम्यान दोन ठिकाणी अतितीव्र स्वरुपाची वळणे होती; त्यामुळे गतीवर मर्यादा यायची. गेल्या पंधरा दिवसांत ही वळणे हटवण्यात आली असून तेथे थेट मार्ग तयार केला आहे; त्यामुळे गाड्यांची गती 110 पर्यंत वाढणार असल्याची माहीती सोलापूर विभागाचे परिचालन अधिकारी रवींद्र वंजारी यांनी दिली. निर्धारीत वेळेत काम पुर्ण करुन प्रवाशांची गैरसोय टाळल्याबद्दल रेल्वे प्रवासी सेनेचे संदीप शिंदे आणि प्रवासी सेवा संघाचे संजय पाटील यांनी सोलापूर विभागाचे अभिनंदन केले

Web Title: Sangli News Solapur-Kolhapur Railway