शहरात आता घनकचरा विलगीकरण मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

सांगली - गेल्या काही वर्षांपासून राज्य शासनाच्या वतीने स्वच्छ नागरी अभियान राबवले जात आहे. यात पहिल्यांदा हागणदारीमुक्त शहरे करण्यावर भर देण्यात आला. आता दुसरा टप्पा म्हणून आता राज्य शासनाच्या वतीने शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर लक्ष दिले जाणार आहे. यातूनच घनकचरा विलगीकरण मोहीम राबविली जाणार आहे. यात महापालिकेच्या माध्यमातून ओला, सुका व आता घरगुती घातक पदार्थांचा कचरा वेगळा गोळा केला जाणार आहे. जुलैअखेर शहरातील तीस टक्के घरातील कचऱ्याचे वर्गीकरण केले जाईल, अशी माहिती आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. खेबुडकर म्हणाले,""शहरामधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे याकरिता घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 ची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहे. त्यामुळे शहरात निर्माण होणारा शंभर टक्के कचरा निर्मितीच्या जागीच वेगवेगळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात ओला, सुका व घरगुती घातक पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने गोळा करावा लागणार आहे. याकरिता पुरेशी व्यवस्था निर्माण करावी लागले. काही सदस्यांनीही यासाठी पाठिंबा दिला आहे. लवकरच याची आखणी करून जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. नागरिकांनी घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करूनच घंटागाडीकडे द्यावे. तसेच काही सोसायटी किंवा गल्लीतील नागरिकांनी एकत्रितपणे ओल्या कचऱ्याचे खतनिर्मितीसाठी प्रयत्न करावा. त्यासाठी पालिकेचे सहकार्य राहील. तसेच सामाजिक संस्थांनीही या मोहिमेसाठी महापालिकेला सहकार्य करावे. 

घनकचऱ्यावरील प्रक्रिया 
ओला कचरा ः निवासी संकुल, व्यापारी संस्था, हॉटेल, उपाहारगृहे आदी ठिकाणच्या जैविक पद्धतीने नष्ट होणाऱ्या कचऱ्यावर कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, बायो मिथेनेशन आदी प्रकारे प्रक्रिया करता येते. 

सुका कचरा ः सुका कचऱ्याचे शहरातील ट्रान्स्फर स्टेशनमध्ये अथवा पदार्थ पुनर्प्राप्ती सुविधा केंद्रावर कागद, प्लास्टिक, काचेच्या व धातूच्या वस्तू अशा विविध घटकांमध्ये दुय्यम विलगीकरण करता येते. 

घरगुती घातक कचरा ः ब्लेड, सॅनिटरी नॅपकीन, रंगांचे डबे, औषधाच्या गोळ्या, त्याचे रॅपर आदी वस्तू घातक स्वरूपाच्या मानल्या जातात. यासाठी स्वतंत्र घातक कचरा विल्हेवाट सुविधा केंद्र स्थापन करण्याची गरज आहे. 

Web Title: sangli news Solid Waste Campaign