दारूबंदीसाठी कडेगावात मतदानास उत्स्फुर्त प्रतिसाद

संतोष कणसे  
रविवार, 29 एप्रिल 2018

कडेगाव - येथील चार प्रभागांतील दारूबंदीसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत सकाळी आठपासून मतदान सुरू झाले. महिला गटागटाने उपस्थित राहून उत्स्फुर्त मतदान केले. दुपारी उन्हाची तीव्रता असल्याने मतदानासाठी शुकशुकाट होता. पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया आहे. सायंकाळी सहा वाजता लगेचच मतमोजणी आहे.

चारही प्रभागातून 50 टक्के मतदानानंतर दारुबंदी होणार की नाही हे जाहीर केले जाईल. बाटली आडवी, की उभी फैसला काही तासात कळणार आहे.  प्रभाग क्रमांक नऊ, दहा, अकरा व चौदा अशा चार प्रभागांतील दारूबंदीसाठी आठवड्यापासून जागृती करण्यात आली. शहरातील महिलांसह नागरिक व सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला.

रोज सकाळी व सायंकाळी प्रचार फेरीसाठी महिला, नागरिकांनी चांगलेच रान तापवले. दारूबंदीचा प्रचार प्रभावी करण्यासाठी प्रबोधनात्मक डिजिटल लावले. वॉटसऍप, फेसबुकसारख्या सोशल साइटवरुनही जोरदार प्रचार करण्यात आला. आज सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रिया सरू झाली.

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चरण कोल्हे हे प्राधिकृत अधिकारी, तर राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक आनंद पवार व सुरेश चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. चारही प्रभागांतून 1 हजार 92 मतदार महिलांची नावे वगळण्यात आली. सायंकाळी पाचपर्यंत मतदानप्रक्रिया सुरू आहे. चळवळीकडून महिलांत जागृती केली जात आहे. मतदान प्रक्रियेत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.  

Web Title: Sangli News Spontaneous response to polling for ban on drink