दहावीतील मुलीची सांगलीत आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

सांगली - अभ्यास का करत नाहीस म्हणून वडिलांनी रागावल्यामुळे अवंतिका दीपक बारटक्के (वय 14, रा. सांगली) या दहावीत शिकणाऱ्या मुलीने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अवंतिका सांगलीत एका कन्या शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. आज सकाळी अवंतिकाच्या भावाला शाळेत सोडण्यासाठी आई-वडील निघाले. वडिलांनी जाताना अवंतिकाला अभ्यास का करत नाहीस म्हणून रागावले. आई-वडील आणि भाऊ गेल्यानंतर घरात ती एकटीच होती. रागाच्या भरात फ्रीजवर चढून तुळईला साडीने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. इकडे मुलाला शाळेत सोडल्यानंतर वडील कामावर निघून गेले. आई घराकडे परतली. घरात आल्यानंतर अवंतिकाने गळफास घेतल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. आरडाओरड केल्यानंतर शेजारील नागरिक जमले. शेजारील धीरज पाटील यांनी तत्काळ गळफास काढून अवंतिकाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले; परंतु ती मृत झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

Web Title: sangli news student suicide crime