ऊस टोळी देण्‍याच्‍या आमिषाने फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

सांगली - ऊस तोड टोळी पुरवण्याच्या आमिषाने शेतकरी, मुकादमाकडून प्रत्येकी तीन लाख उचल घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात मौजे डिग्रज येथील शेतकरी राजगोंडा मगदूम आणि मुकादम बाळासो कोरे (भाटशिरपुरा, जि. उस्मानाबाद) यांनी स्वप्नील गायकवाड याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

स्वप्नील चंद्रकांत गायकवाड (वय २७, भाटशिरपुरा, ता. कळम, जि. उस्मानाबाद) याने ऊस तोडणीसाठी २०१६-१७च्या हंगामासाठी टोळी पुरवतो, असे सांगून ५ सप्टेंबर २०१७ ते ११ डिसेंबर २०१७ या काळात मौजे डिग्रज येथील शेतकरी राजगोंडा अण्णा मगदूम यांच्याकडून तीन लाख रुपये उचलले. मात्र, त्याने ऊस तोडणीसाठी टोळी न पुरवता पैसे घेऊन फसवणूक केली आहे.

स्वप्नील गायकवाड याच्या गावाचाच मुकादम बाळासो ज्ञानू कोरे यांच्याकडूनही त्याने याच काळात टोळी पुरवण्याच्या नावाखाली वेळोवेळी तीन लाख रुपये उचललेत. त्यांच्याकडून पैसे घेऊनही तो गायब झाला आहे. त्यामुळे मगदूम, कोरे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गायकवाड याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

Web Title: Sangli News Sugarcane harvesting team fraud