सांगलीत बेकायदा धंद्यावर कडक कारवाई - सुहेल शर्मा

विजय पाटील
मंगळवार, 13 मार्च 2018

सांगली - जिल्ह्यातील बेकायदा धंदेवाल्यावर कडक कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यात बेकायदा दारूप्रकरणी २०३ जणांना तर जुगारप्रकरणी आत्तापर्यंत 360 जणांना अटक करण्यात आली आहे. 22 तडीपार तर 26 जणांना मोक्का, 7 जण स्थानबद्ध असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिली आहे. 

सांगली जिल्ह्यातीस सर्वसामान्य जनतेला कोणतीही अडचण होऊ नये. यासाठी पोलिसांनी बेकायदा व्यासायिकांविरूद्ध कारवाईचा बगडा उगारला आहे. याबाबत नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी पोलिस घेत आहेत. जनतेने निर्भयपणे आणि निश्चित राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक शर्मा यांनी केले आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्यात अवघ्या तीन महिन्यात जिल्ह्यातील 618 गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असल्याचेही शर्मा यांनी सांगितले. 

गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यात दारूबंदीची 206 केसेस करण्यात आल्या . यामध्ये 30 लाख मुद्देमाल जप्त करून 203 जणांना अटक करण्यात आली आहे. जुगार कारवाईत 175 केसेस केल्या असून 56 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व 360 जणांना अटक करण्यात आली आहे. गांजा तस्करीत 20 जणांना अटक केली आहेत.

सांगली जिल्ह्यातील वाळू चोरीप्रकरणी 3 महिन्यात 42 जणांना अटक झाली आहे. तर 1 कोटीपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याचबरोबर तीन महिन्यात 22 लोकांना तडीपार करण्यात आले. आतापर्यंत 26 जणांना मोका लावण्यात आला आहे. तसेच 7 लोकांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. यापुढेही बेकायदा धंदे चालवणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही पोलीस अधीक्षक शर्मा यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Sangli News Suhel Sharma Press