किंदरवाडीत प्रेमीयुगुलाने विष पिऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

तासगाव -  किंदरवाडी (ता. तासगाव) गावच्या हद्दीत आकाश पांडुरंग साळुंखे आणि माधुरी संजय पाटील (रा. निंबळक - बोरगाव) या प्रेमीयुगुलाने विष पिऊन आत्महत्या केली. तीन ते चार दिवसांपूर्वी झालेला प्रकार उघडकीस आला.

कचरेवाडी - तासगाव रस्त्यावर आतमध्ये एक किलोमीटर अंतरावर एका खासगी शेतात मोटारसायकल (एमएच १० बीवाय ४९१५) ही तीन-चार दिवस उभी होती.  शेतकऱ्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता गाडीपासून दोनशे मीटरवर किंदरवाडी हद्दीत दोन मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळले. तातडीने हा प्रकार तासगाव पोलिसांना कळविला. मृतदेहाजवळ विषाच्या बाटल्या पडल्या होत्या. मृतदेह पूर्ण सडलेले होते. हा प्रकार समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बनकर, सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी यांच्यासह पथकाने धाव घेतली. तोपर्यंत अंधार पडला होता. पोलिसांनी मोटारसायकल क्रमांकावरून शोध सुरू केला असता मृत दोघे निंबळक (ता. तासगाव) येथील आकाश पांडुरंग साळुंखे (वय २३) आणि माधुरी संजय पाटील (वय १९, बोरगाव, ता. तासगाव) असल्याचे निष्पन्न झाले. 

Web Title: Sangli News suicide incidence in Kindarwadi