दिग्विजय यांच्या कार्यकत्यांनी घरासमोर बाटल्या फोडल्या - सुतार

अजित झळके
रविवार, 24 जून 2018

सांगली - राष्ट्रवादीचे नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशींना पराभवाची खात्री झाल्याने ते सुयोग सुतार यांना बदनाम करण्याचा, डिवचण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांच्या सांगण्यावरूनच आमच्या घरासमोर दारुच्या बाटल्या फोडल्या गेल्या. त्याला आम्ही केवळ विरोध केला, असा प्रतिहल्ला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व सुयोग यांचे भाऊ संदीप सुतार आणि सुयोग यांची पत्नी सौ. गीता यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

प्रभाग 17 मधील गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना दिग्विजय यांच्या आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले, ""राष्ट्रवादीने गुन्हेगारीवर बोलूच नये. दंगल घडवणारे, खंडणीबहाद्दर पोसणाऱ्या पक्षाला तो अधिकार नाही. मी व सुयोग बाहेरगावी असताना दिग्विजय व कार्यकर्ते मोटारीमधून आले. त्यांनी घरासमोर मद्याच्या बाटली फोडल्या, अर्वाच्च शिविगाळ केली. घरात महिला, लहान मुले होती. आम्ही दुसऱ्या दिवशी आलो, त्यानंतर काही गुंडांनी पुन्हा तसा प्रकार केला. आम्ही त्यांचा पाठलाग केला. आमच्या आयाबहिणींवर हल्ला होत असेल तर बघत बसावे का? ते उलटा आरोप करताहेत.'' 
ते म्हणाले, ""गेल्या निवडणुकीत सुयोग थोडक्‍या मतात पराभूत झाले. पाच वर्षात दिग्विजय यांनी लावलेले दिवे पाहता त्यांचा पराभव नक्की आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी कोट्यावधीची विकासकामे केली आहे. त्या भितीतूनच मटकावाल्यांना हाताशी धरून ते खेळ करताहेत. सुयोगला मुद्दाम डिवचले जात आहे. आम्ही कायदेशीर पद्धतीनेच जावू. आम्ही पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांची नावे दिली आहेत. प्रसंगी पालकमंत्री सुभाष देशमुख, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना भेटू.'' 

पोलिस दखल घेईनात 
गीता सुतार म्हणाल्या, ""मी विश्रामबाग पोलिस ठाण्यात चार तास बसले, मात्र त्यांनी माझी फिर्याद घेतली नाही. दिग्विजय सूर्यवंशी त्या दिवशी गाडीत होते. त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी बाटल्या फोडल्या होत्या.''

Web Title: Sangli News suyog sutar press