युती करु; पण स्वाभीमान राखून - स्वाभीमानी रिपब्लीकनचा पवित्रा

संतोष भिसे
गुरुवार, 28 जून 2018

मिरज - येऊ तर स्वाभीमानाने, अन्यथा स्वबळावर अशी घोषणा स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाने केली आहे. सांगली जिल्ह्याच्या पटलावर काही महिन्यांपुर्वीच उदयाला आलेल्या आणि थेट महापालिका निवडणुकीच्या मैदानात उडी घेतलेल्या या पक्षाने स्वाभीमान महत्वाचा हे ब्रीद महत्वाचे मानले आहे.

मिरज - येऊ तर स्वाभीमानाने, अन्यथा स्वबळावर अशी घोषणा स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाने केली आहे. सांगली जिल्ह्याच्या पटलावर काही महिन्यांपुर्वीच उदयाला आलेल्या आणि थेट महापालिका निवडणुकीच्या मैदानात उडी घेतलेल्या या पक्षाने स्वाभीमान महत्वाचा हे ब्रीद महत्वाचे मानले आहे.

येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे म्हणाले, निवडणुकीत पक्ष आपले अस्तित्व निश्‍चित दाखवून देईल. आठ ते दहा प्रभागांत उमेदवार उभे करणार आहोत. भाजप आणि शिवसेना हे जातीयवादी पक्ष प्रमुख विरोधक असतील. उर्वरीत अन्य कोणत्याही पक्षांशी युतीची तयारी आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चेची प्राथमिक फेरी पुर्ण झाली आहे. प्रभाग क्रमांक तीन, सात, आठ, अकरा, एकोणीस, वीस येथे लक्ष केंद्रीत केले आहे. पक्ष फक्त मागासवर्गीयांपुरता मर्यादीत नाही. मुस्लिम, बहुजन व अन्य धर्मियांचाही पाठींबा आहे. पुणे-मुंबईत पक्षाने सकारात्मक कामगिरी केली आहे; सांगली-मिरजेतही त्याची पुनरावृत्ती करु.

डॉ कांबळे म्हणाले, कॉंग्रेस पक्षाने आरपीआयबरोबर युती करण्यापेक्षा स्वाभीमानी रिपब्लीकन पक्षाशी युती करणे कधीही फायद्याचे ठरेल. मिरजेतील रिपाई नेते दरवर्षी वेगवेगळ्या पक्षाचे कुंकू कपाळी लावतात. एकाने नुकतीच मुंबईत जाऊन जातीयवादी भाजपची माळ गळ्यात घातली. मिरजेत परतताच "तो मी नव्हेच" असे जाहीर केले. पैसे आणि दादागिरीच्या जोरावर निवडणुका लढवण्याचे दिवस संपले आहेत. आजवर समाजाचा वापर फक्त निवडणुकीपुरता केला आहे.

निवडणुकीत प्रचाराला पक्षाचे संस्थापक मनोज संसारे स्वतः येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील धोरणांसाठीचे सर्वाधिकार डॉ महेशकुमार कांबळे यांना दिले आहेत, असेही यावेळी पक्षाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. पक्षाचे पदाधिकारी वसंतराव म्हस्के, प्रदेश उपाध्यक्ष बाळाराम जाधव, अशोक वाघमारे, पक्षाचे संघटक निशिकांत दासुद, अमित हिरवे, सचिन कांबळे यावेळी उपस्थित होते.

 

Web Title: Sangli News Swabhimani Republic party press