स्वच्छ सर्वेक्षणसाठी विटयात तपासणीपथक दाखल

प्रताप मेटकरी
रविवार, 14 जानेवारी 2018

विटा - स्वच्छ विटा सर्वेक्षण 2018 स्पर्धेच्या पाहणीसाठी केंद्रीय तपासणीपथक विटा शहरात दाखल झाले आहे. हे पथक 16 जानेवारीपर्यंत विटा शहरातील स्वच्छतेची पाहणी करणार आहे.

विटा - स्वच्छ विटा सर्वेक्षण 2018 स्पर्धेच्या पाहणीसाठी केंद्रीय तपासणीपथक विटा शहरात दाखल झाले आहे. हे पथक 16 जानेवारीपर्यंत विटा शहरातील स्वच्छतेची पाहणी करणार आहे. कागदपत्रांची तपासणी, 14 जानेवारी रोजी शहरातील मुख्य ठिकाणांची पाहणी केली जाणार आहे. तर 15 जानेवारी रोजी नागरिकांशी थेट संवाद साधत स्वच्छतेबाबत प्रश्न विचारून फीडबॅक घेणार आहेत. 

विट्याला देशपातळीवर स्वच्छ शहर म्हणून नावलौकीक मिळवून देण्याचा निर्धार विटा नगरपालिका प्रशासनाबरोबरच प्रत्येक विटेकर नागरिकाने केला आहे. सध्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेची तयारी युद्धपातळीवर राबवली जात आहे. लोकसहभागातून "विटा शहर स्वच्छ आणि सुंदर" करण्यावर विटा पालिकेने भर दिला आहे.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्षा प्रतिभा चोथे, मुख्याधिकारी महेश रोकडे, माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील, आरोग्य सभापती दहावीर शितोळे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व सफाई कर्मचारी अविरतपणे योगदान देत आहेत.

Web Title: Sangli News Swacchata Survey committee in Vita