कोरोचीतील वृद्धाचा "स्वाईन फ्लू' ने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

सांगली - कोरोची (ता. हातकणंगले) येथील आपगोंडा नरसगोंडा पाटील (वय 82) या वृद्धाचा "स्वाईन फ्लू' मुळे येथील एका खासगी रुग्णालयात आज मृत्यू झाला. येथील कलानगरातील महिला आणि देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील एकास स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. दोघांना सिव्हिलमध्ये दाखल केले आहे. 

कलानगर येथील महिला आठवड्यापूर्वी पुणे येथे गेली होती. तेथे तिला स्वाईन फ्लूची लक्षणे दिसून आली. त्यामुळे ती सिव्हिलमध्ये दाखल झाली. तिच्या घशातील "स्वॅब' चा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर अहवाल "पॉझिटीव्ह' आला. सांगलीत स्वाईन फ्लू चा पहिला रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. तसेच देवराष्ट्रे येथील एकास स्वाईन फ्लू झाल्यामुळे त्याला प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले होते. आज त्याला पुन्हा सिव्हिलमध्ये उपचारास दाखल केले. 

दरम्यान, कोरोची येथील आपगोंडा पाटील या वृद्धास स्वाईन फ्लूची लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी सिव्हिल हॉस्पिटलजवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. "स्वॅब' चे नमुने घेऊन मुंबईतील "एसआरएल' लॅबमध्ये तातडीने पाठवले. त्याचा अहवाल "पॉझिटीव्ह' आला. पाटील यांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे आज दुपारी खासगी रुग्णालयातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह सिव्हिलमध्ये आणून पंचनामा केला. 

जिल्ह्यात यंदाच्या हंगामात स्वाईन फ्लूचा पहिला बळी गेला आहे. त्यामुळे आरोग्य विभागातर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. स्वाईन फ्लूची लक्षणे दिसताच तत्काळ शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

Web Title: sangli news swine flu