लाच घेताना तलाठ्यासह एजंटला रंगेहात पकडले

विजय पाटील
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - चार हजार रुपयांची लाच घेताना एका तलाठ्यासह एजंटला रंगेहात अटक करण्यात आली आहे. गुंठेवारी प्लॉट बिगर शेती (एनए) करण्यासाठी कुपवाड येथील तलाठयाने ही लाच मागितली होती.

कोल्हापूर - चार हजार रुपयांची लाच घेताना एका तलाठ्यासह एजंटला रंगेहात अटक करण्यात आली आहे. गुंठेवारी प्लॉट बिगर शेती (एनए) करण्यासाठी कुपवाड येथील तलाठयाने ही लाच मागितली होती.

सांगलीच्या कुपवाड येथील तलाठी शकील खतीब आणि त्यांचा साथीदार संजय आवळे यास आज चार हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. एका तक्रारदाराकडे कुपवाड हद्दीतील असणारा गुंठेवारी क्षेत्रातील प्लॉट बिगर शेती करुन देण्यासाठी ही लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली.  यानुसार पडताळणी करुन आज सापळा लावून तलाठी कार्यालयात लाच घेताना तलाठी व त्याच्या एजंटला अटक करण्यात आली. 

Web Title: Sangli News talathi and agent arrested in bribe case

टॅग्स