शिक्षकांचा अन्य कामासाठी उपयोग नको 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

सांगली - जिल्हा परिषद शाळातील शिक्षकांनी दैनंदिन कर्तव्य कालावधीत केवळ शैक्षणिक कामेच करावीत, असे आदेश ग्रामविकास सचिवांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत प्रमाणपत्र सादर करावे, अशा सूचनाही दिल्या आहेत. 

जिल्हा परिषदांमधील शिक्षकांची नियुक्ती ही विद्यार्थ्यांना शिकवणे आणि तत्सम शैक्षणिक कामासाठीच केली जाते. काही जिल्हा परिषदांमध्ये मंजूर पदापेक्षा शिक्षकांची संख्या कमी आहे. अशा ठिकाणी अपुऱ्या शिक्षकांमधून सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नियंत्रण ठेवावे लागते. 

शिक्षकांना अशैक्षणिक कामे अनेकदा करावी लागतात. त्यामुळे त्याचा शिकवण्यावर परिणाम होतो. अशैक्षिणक कामाचा ताण कमी करावा अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत असते. काहीवेळा जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्ती दिलेल्या शिक्षकांना शाळेमध्ये नियुक्ती दिली जात नाही. तसेच काही शिक्षकांची नियुक्ती शाळेवर असल्याचे दाखवून अन्य कामासाठी त्यांना वापरून घेतले जाते. शिक्षकांना दैनंदिन कर्तव्य काळात अन्य कामांसाठी जुंपल्याबद्दल शासनस्तरावर झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये तीव्र नापसंती दर्शवली गेली. 

विभागीय आयुक्त किंवा शासनस्तरावरून विशेष आदेश नसल्यास शिक्षकांना शैक्षणिक कामाशिवाय अन्य कोणतेही काम करू नये. जिल्हा परिषदांनी शिक्षणाशिवाय अन्य कामासाठी वापर करून घेऊ नये असे स्पष्ट आदेश ग्रामविकास सचिवांनी यापूर्वीच दिले आहेत. तरीही काही जिल्ह्यात आदेशाची पूर्तता केली जात नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. शिक्षकांनी दैनंदिन कर्तव्य वेळेत केवळ शिकवण्याचे काम करणे अपेक्षित आहे. यावेळेत त्यांना दुसरे काम करण्याची सवलत दिली नाही. 

जिल्हा परिषद शाळातील शिक्षक शैक्षणिक कामाशिवाय अन्य कोणतेही काम करत नाहीत ना? याबाबत तपासणी करून तसे प्रमाणपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामविकास सचिवांना सादर करावे अशा सूचनाही दिल्या आहेत. आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने जे शिक्षक "मॅपिंग' चे काम करत आहेत अशा शिक्षकांना केवळ 15 दिवसांची सवलत दिली आहे. 

Web Title: sangli news teacher zp school