सांगली जिल्ह्यातून विक्रमी दहा हजार टन द्राक्षांची निर्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

सांगली - युरोप व आखाती देशांतील अन्न पदार्थ व शेतमाल आयातीचे निकष तंतोतंत पाळण्याचा आत्मविश्‍वास वाढल्याने यंदा जिल्ह्यातून द्राक्षांची विक्रमी निर्यात झाली. आजअखेर जिल्ह्यातील निर्यातीचा आकडा तब्बल १० हजार ६०० टन इतका आहे. गेल्यावर्षीपेक्षा सुमारे १७०० टन  निर्यात वाढली आहे.

सांगली - युरोप व आखाती देशांतील अन्न पदार्थ व शेतमाल आयातीचे निकष तंतोतंत पाळण्याचा आत्मविश्‍वास वाढल्याने यंदा जिल्ह्यातून द्राक्षांची विक्रमी निर्यात झाली. आजअखेर जिल्ह्यातील निर्यातीचा आकडा तब्बल १० हजार ६०० टन इतका आहे. गेल्यावर्षीपेक्षा सुमारे १७०० टन  निर्यात वाढली आहे.

आणखी तीन-चार हजार टनांची भर पडेल, असा अंदाज आहे. 
युरोपीय देशांतील अन्न पदार्थ आयातीचे निकष कडक आहेत. त्यानुसार पदार्थ किंवा शेतमाल नसेल तर तो नाकारला जातो. काही वर्षांपूर्वी त्याचा दणका जिल्ह्यातील निर्यातदार बागायतदारांना बसला. हजारो कंटेनर द्राक्षे युरोपीय देशांनी नाकारली. ती समुद्रात फेकावी लागली. त्यानंतर निर्यातीची द्राक्ष निर्माण करताना काटेकोर  काळजी घेतली जाऊ लागली.

खरेदीदार कंपन्यांसह तज्ज्ञांचा सल्ला आणि स्वतः शेतकऱ्यांनी जागरूक राहून हे निकष पाळले. त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. त्याचा फायदा यंदा झाला आहे. सन २०१३-१४ मध्ये ५ हजार ५९ टन इतकी निर्यात होती. ती चार वर्षांत दुप्पट म्हणजे १० हजार टनांवर पोहोचली. एप्रिलच्या मध्यापर्यंत  निर्यात सुरू राहील, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

युरोपचा वाटा ७५ टक्के जिल्ह्यातून विदेशात निर्यात होणाऱ्या द्राक्षांत सुमारे ७५ टक्के प्रमाण युरोपीय देशांचे आहे. 
 

दीडपट शेतकरी
निर्यातक्षम द्राक्ष निर्मितीसाठी ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तब्बल दीडपटीने वाढली. निर्यात विक्रमी होणार, असा अंदाज होता. गेल्यावर्षी १ हजार २९१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यांचे ६७८ हेक्‍टर  क्षेत्र होते. यावर्षी म्हणजे सन २०१७-१८ मध्ये १  हजार ९५८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्याचे क्षेत्र १ हजार ३० हेक्‍टर आहे. 
 

Web Title: Sangli News Ten Thousand tons grape export