कवठेमहांकाळमधील चोरी प्रकरणी अल्पवयीन मुलगा ताब्यात

बलराज पवार
रविवार, 22 जुलै 2018

सांगली - कवठेमहांकाळ शहरातील राही हार्डवेअर या दुकानातील सात लाखांची चोरी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. या मुलाचा मामा आणि
मामाच्या मित्राने ही चोरी केली असून दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राही हार्डवेअर या दुकानातून काही दिवसांपुर्वी एक लॅपटॉप, 80 किलो तांब्याची वायर आणि पितळी वॉलबॉल 30 नग असा एकूण सात लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकरणातील एक अल्पवयीन मुलगा सांगलीत अहिल्यानगर चौकात गणपती मंदिराच्या जवळ आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली. त्यांनी पथकासह गणेश मंदिराजवळ सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.

निरीक्षक पिंगळे यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने राही हार्डवेअर दुकानातून मी, माझा मामा आणि मामाचा मित्र असे तिघांनी चोरी केल्याचे सांगितले. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात चौकशी केली असता तशी चोरी झाल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या अल्पवयीन मुलास कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर त्याच्या मामा आणि मामाच्या मित्राचा शोध घेण्यात येत आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, राहुल जाधव, अमित परीट, संदीप पाटील, संजय पाटील, सचिन कनप, शशिकांत जाधव, सचिन सुर्यवंशी, अरुण सोकटे यांनी केली.

Web Title: Sangli News theft incidence in Kavthemahankal