विजेचा शॉक लागून येलूरमध्ये तीन शेतकऱ्याचा मृत्यू

विजय पाटील
शनिवार, 31 मार्च 2018

सांगली - जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येलूरमध्ये विजेचा शॉक लागून तीन शेतकऱ्याचा  मृत्यू झाला आहे. शेतीमध्ये उसाला पाणी पाजत असताना रात्री ही घटना घडली. यामध्ये आई मुलगा आणि एक शेत गड्याचा मृत्यू झाला आहे.

घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेेेेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याच येलूर गावात गेल्या वर्ष भरात शॉक लागून 5 ते 6 शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मात्र वीज महावितरण यावर काहीच उपाय योजना करत नाही. शेतामधून जी वायर जाते. ती कुठे कट असते याची पाहणी वीज वितरण करत नाही. याच्या गलथान कारभार मुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.. 

Web Title: Sangli News three farmers dead in Yellur