सांगलीत टॉप २० संस्थांकडे ३०० कोटींची थकबाकी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

सांगली - आर्थिक वर्ष संपण्यास केवळ १० दिवस शिल्लक आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत वसुलीची धावाधाव सुरू झाली आहे. बॅंकेची एकूण थकबाकी ५०० कोटींच्या घरात आहे. टॉप २० संस्थांकडे सुमारे ३०० कोटींची थकबाकी आहे. बड्या थकबाकीदारांच्या नावांबाबत मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे. 

अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले, की कर्जवसुली, ठेवी आणि गुंतवणुकीसाठीचा  आराखडा तयार केला आहे. कर्जमाफीमुळे काही रक्कम वसूल झाली आहे. त्या २० संस्थांना ३१ मार्चपूर्वी थकबाकी भरण्याबाबतच्या नोटिसाही दिल्या.  बड्या थकबाकीदार संस्थांवर एप्रिलमध्ये कारवाई अटळ आहे. 

कर्जवसुलीचा आराखडा तयार

जिल्हा बॅंकेकडून बड्या संस्थांनी कर्ज घेतले आहे. संस्थाकडून कर्जाची नियमित परतफेड करणे आवश्‍यक आहे. कर्ज भरले नसल्याने थकबाकी वाढतच गेली आहे. परिणामी एनपीएत वाढ होत आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अवघ्या दहा दिवस आहेत. कर्ज वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सरकारच्या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरलेली नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची आशा असल्याने कर्जाची रक्कम जैसे थे असल्याचे दिसते. थकबाकीदार संस्थांना वसुलीसाठी नोटीस पाठवल्या आहेत. 

बड्या थकबाकीदार संस्थांच्या वसुलीकडे दुर्लक्ष  केल्यास नाबार्डकडून ठपका ठेवण्याची शक्‍यता असल्याची अधिकारी वर्गात चर्चा आहे. ३१ मार्चपर्यंत बड्या संस्थांना कर्जाची रक्कम भरण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या कालावधीत रक्कम न  भरल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष  श्री. पाटील यांनी संकेत दिले आहेत. ठेवी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही सर्व शाखांना दिल्या आहेत. बॅंकेकडील ठेवी योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी अभ्यास करण्यात येत आहे. थकीत कर्जवसुली, ठेवी आणि गुंतवणूक याबाबत आराखडा तयार केला आहे, त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. 

वसुलीची जोरदार मोहीम सुरू आहे. प्रत्येक तालुक्‍यासाठी विशेष वसुली पथक नेमले आहे. मध्यम व दीर्घ मुदत थकबाकीदारांच्या घरी हेलपाटे सुरू झाले आहेत. टॉप २० संस्थांनाही नोटिसा दिल्या आहेत. मार्च अखेरीस त्या संस्था थकीत गेल्या तर त्यांच्यावर तातडीने कारवाईचे पाऊल उचलले जाईल. त्यांची नावे आजघडीला दिली तर वसुलीस बाधा येण्याची शक्‍यता आहे.
- प्रतापसिंह चव्हाण,
मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅंक

Web Title: Sangli News Top 20 organizations have outstanding Rs 300 crore