चांदोली अभयारण्यात पर्यटनवाढीसाठी व्हावे बोटिंग

शिवाजीराव चौगुले
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

शिराळा - चांदोली राष्ट्रीय उद्यानामुळे शिराळाचे नाव देशपातळीवर झळकत असले तरी येथील पर्यटनाला हवी तेवढी चालना मिळाली नसल्याने येथील पर्यटनवाढ ही कासव गतीने आहे. त्यासाठी शासनाने येथील विविध परिसरांतील नैसर्गिक स्रोतांचा योग्य पद्घतीने वापर करू, पर्यटनवाढीला चालना देण्याची गरज आहे. प्राथमिक टप्प्यात येथे वसंतसागर जलाशयात बोटिंग सुरू केल्यास पर्यटनवाढीला चांगली चालना मिळण्यास मदत होईल. 

चांदोली परिसरात चांदोली राष्ट्रीय उद्यान व चांदोली धरण ही दोन महत्त्वाची ठिकाणे आहेत. येथील चांदोली धरणातील वसंत सागर जलाशयात बोटिंग सुरू केले, तर पर्यटकांना आकर्षित होण्याचा हा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. मात्र येथील विकास करण्याची प्रथम संधी ही  ग्रामपरिस्थितीकीय समितीला आहेत. ती समिती शाहूवाडी तालुक्‍यातील उखळू येथे समिती स्थापन केली आहे. शिराळा तालुक्‍यातील मणदूर गावालाही ही समिती स्थापन करण्याचे अधिकार आहेत. मात्र त्या गावाने अद्ययावत त्यास सहभाग घेतलो नाही. त्यामुळे उखळू समितीला या परिसरातील विकासाचे अधिकर आहेत. येथील बोटिंग प्रकल्पाचे नियोजन वन्यजीव विभागाने कागदोपत्री केले आहे.

यासाठी पाच किलोमीटर अंतराचे व २५० हेक्‍टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. या बोटिंगमुळे लोकांना तनाळीचा धबधबा पहाता येणार आहे. मात्र हे नियोजन केवळ कागदावर न रहात त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक यांच्या सोबत २०१६ ला चांदोली येथे झालेल्या बैठकीत  बोटिंग सुरू करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यास जवळपास दीड वर्षे होऊन गेली आहेत. अद्याप त्यावर पुढील कार्यवाही झालेली नाही. या परिसरातील पर्यटन विकासासाठी पहिले प्राधान्य या ग्रामपरिस्थितीकीय समितीला असल्याने उखळू गावच्या समिती मार्फत  बोटिंग करणे शक्‍य होणार आहे. सध्या जिल्हाधिकारी म्हणून विजयकुमार काळम-पाटील यांनी याकडे गांभीर्याने पाहून हा बोटिंग प्रकल्पास चालना दिल्यास या परिसराचा कायापालट होण्यास मदत होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli news for tourism development boating in Chandoli Sanctuary needed