सांगलीत शिवजयंती उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सांगली - शहर आणि परिसरात शिवजयंती पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विविध मंडळे, संघटनांतर्फे शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यासह मनसे, हिंदू एकता आंदोलन, हिंदवी स्वराज संस्थेतर्फेही जयंती साजरी करण्यात आली. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राजवाडा परिसरात मुख्य कार्यक्रम झाला. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा आणि उद्योजक सतीस मालू यांच्या हस्ते शिवजयंती उत्सवाचे उद्घाटन झाले. माजी आमदार नितीन शिंदे, मनसेच्या राज्य उपाध्यक्षा अॅड. स्वाती शिंदे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करण्यात आला.

गेल्या 34 वर्षांपासून परंपरेने शिवजंयती साजरी केली जाते. यंदा गेट वे ऑफ इंडियाची प्रतिकृती साजरी साकारली आहे. 

- नितीन शिंदे 

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले विचार महाराष्ट्रानेच नव्हे, तर देशाने आत्मसात करण्याची गरज आहे, असे मत अधीक्षक शर्मा यांनी मांडले.

राजवाडा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. भगवे झेंडे परिसरात लावून सारा परिसर भगवामय करण्यात आला होता. यावेळी सुनिता इनामदार, अमर पडळकर, आदित्य पटवर्धन, चेतन भोसले, रोहित घुबडे, स्वप्निल शिंदे, गजानन मोरे, प्रदीप निकम, विजय मौर्य, प्राची कुदळे, ओंकार पवार, स्वप्निल कुंभोजकर, ओंकार चौगुले, युवराज काटकर उपस्थित होते. 

कुपवाड परिसरही भगवामय 

कुपवाड परिसरातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कुपवाड शहर शिवसेनेतेर्फे मुख्य चौकात शिवजयंती साजरी करण्यात आली. शहर प्रमुख अमोल पाटील यांच्या पुढाकारातून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही उत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी उपजिल्हा प्रमुख महादेव मगदूम, उपशहर प्रमुख तानाजी जाधव, अजित कांबळे उपस्थित होते. शिवसेना दुर्गानगर शाखेतर्फेही जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाप्रमुख संजय विभूते, श्रीकांत चौगुले, सिद्धार्थ चौगुले उपस्थित होते.

Web Title: Sangli News traditional Shivjayanti festival