दंडोबावर वृक्षारोपन कार्यक्रमास अडचण नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट

अजित झळके
गुरुवार, 28 जून 2018

सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि वनविभागाचा बहुचर्चित वृक्षारोपन समारंभ आचारसंहितेत अडकण्याची शक्‍यता निर्माण झाली. परंतू, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी मनपा क्षेत्राबाहेर वृक्षारोपणास काहीच अडचण नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर मिरज-कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या हद्दीत पसरलेल्या दंडोबाच्या डोंगरावर झाडे लावण्याचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे.

सांगली - सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि वनविभागाचा बहुचर्चित वृक्षारोपन समारंभ आचारसंहितेत अडकण्याची शक्‍यता निर्माण झाली. परंतू, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी मनपा क्षेत्राबाहेर वृक्षारोपणास काहीच अडचण नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर मिरज-कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या हद्दीत पसरलेल्या दंडोबाच्या डोंगरावर झाडे लावण्याचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. येत्या रविवारी (ता. 1) सकाळी नऊपासून हा कार्यक्रम होणार आहे. उपवन संरक्षक भारतसिंह हाडा यांनी ही माहिती दिली.

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड योजनेची गेल्या दोन महिन्यांपासून जंगी तयारी सुरु आहे. कुठल्या ठिकाणी कुणी वृक्षारोपण करायचे, तिथे जबाबदारी कुणाची, खासगी संस्थांचा सहभाग कसा राहील, आदी विषयांवर सखोल अभ्यास करण्यात आला. ही माहिती डिजीटल पद्धतीने भरण्यात आली. त्यामुळे यंदाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारी यंत्रणा कामाला लागली होती. अशावेळी निवडणूक जाहीर झाल्याने वृक्षारोपण समारंभ अडचणीत येईल की काय, अशी शंका घेतली जात होती. त्याबाबत श्री. हाडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शंका निरसन करून घेतले. त्यामुळे आता 1 जुलै रोजी वृक्षारोपण समारंभ होणार हे निश्‍चित झाले.

Web Title: Sangli News Tree plantation on Dandoba