पालिकेला 25 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

सांगली - शासनाच्या धोरणानुसार यंदा पालिकेला 25 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 5 जुलैपासून ही मोहीम राबवली जाणार असून त्यात फळ, फुल झाडांचा समावेश आहे. तसेच वृक्षारोपणानंतर त्या झाडांचे संगोपन करण्यावरही भर दिला जाईल, अशी माहिती आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच नव्या बांगांसह आमराईत फुलपाखरु उद्यानाची निर्मिती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले, ""राज्य शासनाकडून 4 कोटी वृक्षारोपणाचा संकल्प आहे. त्यानुसार सांगली पालिकेला 25 हजार झाडे लावून ती जगविण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीने काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात काळी खण परिसर, हनुमाननगर, शिवाजी हौसिंग सोसायटी परिसरात झाडे लावली जाणार आहे. तसेच प्रत्यक प्रभागातील वृक्षारोपणाचे नियोजन केले आहे. त्यात फळ, फुल झाडांचा समावेश आहे. झाडांची खरेदीही योग्य उंचीची केली जाईल, जणेकरून त्यांचे संगोपन करता येईल. तसेच शासनाच्या साडेतीन कोटी निधीतून विशेष प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. शहराच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या प्रकल्प असतील. नव्या बागांची उभारणी केली जाईल. त्यात 80 टक्के झाडेच लावली जातील. तसेच आमराईत फुलपाखरुचे उद्यान उभारण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून शहराच्या सौंदर्यात भर पडेल. तसेच फुल झाडांच्या उद्यानाचेही नियोजन आहे.'' 

गतवर्षीचे उद्दिष्ट 
गतवर्षी पालिकेला साडेचार हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात असताना तब्बल सहा हजार झाडे लावली होती. या झाडांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील साडेतीन हजार झाडांची चांगली वाढ झाली आहे, असे श्री. खेबुडकर यांनी सांगितले.

Web Title: sangli news tree sangli municipal corporation tree planting