मगरींना पकडण्याचे प्रयत्न सुरूच

सांगली - बायपास पुलाजवळ झालेले मगरीचे दर्शन.
सांगली - बायपास पुलाजवळ झालेले मगरीचे दर्शन.

नागरी वस्तीला धोका; नाल्यालगत चरी खणून पकडण्याची शर्यत

सांगली - येथील बायपास पुलाजवळील नाल्यात मगरीचा वावर आढळून आला. त्यामुळे परिसरातील नागरी वस्तीला धोका निर्माण झाला आहे. या मगरीला सुरक्षितस्थळी नेण्यासाठी वनविभागासह प्राणिमित्रांचे आजही प्रयत्न सुरूच होते. नाल्यालगत चरी खणून मगरीला पकडण्यासाठी सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते, मात्र अद्याप यश आलेले नाही. 

कृष्णा नदीत मगरींचा वावर पूर्वीपासूनच आहे. मात्र काही वर्षांत बेसुमार वाळू उपशामुळे मगरींचे अधिवास नष्ट  होऊ लागले आहेत. त्यामुळे मगरींचे नागरी वस्तीजवळ वारंवार दर्शन होत आहे. सध्या आयर्विन पुलाजवळ मगरीचे दर्शन नित्याचे बनले आहे. मात्र बायपास पुलाजवळील नाल्यात चार दिवसांपासून दहा फुटी तीन ते पाच मगरींचा वावर असल्याचे नागरिकांनी प्राणिमित्रांना कळवले. त्यानंतर प्राणिमित्रांनी तातडीने वनविभागाला याबाबत कळवले. नागरी वस्तीला संभाव्य धोका लक्षात घेता वनविभागाने ही मगर तातडीने सुरक्षितस्थळी नेण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. सध्या नाल्याच्या परिसरात मगरीला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. पिंजऱ्यात भक्ष्यही ठेवण्यात  आले आहे. आज सकाळी चर खणण्यात आली. त्यातही पिंजरे लावण्यात आले आहेत. मात्र सायंकाळपर्यंत पकडण्यात यश आले नव्हते. बघ्यांची गर्दी वाढत  चालली आहे.

मगरीला पकडण्यासाठी ‘ॲनिमल राहत’चे किरण नाईक, ग्रुप ऑफ ॲनिमलचे सचिन साळुंखे, दीपक शिंदे, इलियास शेख, विशाल चव्हाण, पुष्कर कागलकर, अवधूत सावंत, ऋषी घोरपडे, राहुल पवार यांची टीम कार्यरत आहेत. वनविभागाचे निरीक्षक श्री. कोळी, वनपाल मिलिंद वाघमारे, इक्‍बाल पठाण, महादेव मुळे, सुरेश लोहार, संभाजी ढवळे यांचे त्यांना सहकार्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com