तूर खरेदी केंद्रांअभावी व्यापारी पाडताहेत दर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

सांगली - दुष्काळी भागातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्‍यात तूर पिकाचे उत्पादन घेतात. बाजारात तूर विक्रीसाठी येऊ लागली आहे. जिल्ह्यात तूर खरेदी शासकीय केंद्र सुरू नाही. परिणामी व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत. शेतकऱ्यांना 2500 ते 3600 रुपये क्‍विंटल दराने तुरीची विक्री करावी लागते आहे. यामुळे तूर पिकासाठीचा उत्पादन खर्चही निघणे मुश्‍कील झाले आहे. 

सांगली - दुष्काळी भागातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्‍यात तूर पिकाचे उत्पादन घेतात. बाजारात तूर विक्रीसाठी येऊ लागली आहे. जिल्ह्यात तूर खरेदी शासकीय केंद्र सुरू नाही. परिणामी व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत. शेतकऱ्यांना 2500 ते 3600 रुपये क्‍विंटल दराने तुरीची विक्री करावी लागते आहे. यामुळे तूर पिकासाठीचा उत्पादन खर्चही निघणे मुश्‍कील झाले आहे. 

जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाची कमतरता यामुळे तुरीच्या क्षेत्रात घट झाली. पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी तूर पीक काढून टाकले होते. जत तालुक्‍यात तूर काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, शासनाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी कोणत्याच हालचाली सुरू केल्या नसल्याचे चित्र आहे.

हंगामाच्या सुरवातीला तुरीला 4 हजार रुपये दर प्रतिक्विंटलला मिळाला. पण गेल्या चार दिवसांपासून 2300 ते 3 हजार रुपये असा दर मिळतो. त्यामुळे आमचा तोटा होतोय. जतमध्ये तूर खरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात तूर विक्री करावी लागतेय. 
- विश्‍वनाथ माळी,
तूर उत्पादक शेतकरी, वळसंग, ता. जत, जि. सांगली. 

तूर पिकाची काढणी हंगाम सुरू होण्याअगोदर खरेदी केंद्र सुरू होणे आवश्‍यक आहे. पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी आजमितीस तुरीच्या विक्रीसाठी खासगी व्यापाऱ्यांचा आधार घेत आहेत. शेतकऱ्यांकडील तूर विक्री करून झाल्यानंतर खरेदी केंद्र सुरू केले जाते. यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्राचा उपयोग होत नाही. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वीच तूर खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. 

व्यापारी पाडताहेत दर 
शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू केले तरच तुरीचे दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र, जोपर्यंत खरेदी केंद्र सुरू होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळणार नाही. तुरीला सुरवातीला 4 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. त्याच तुरीला आज अडीच हजार ते तीन हजार सहाशे असा दर मिळतोय. खरेदी केंद्र सुरू नसल्याने व्यापारी फायदा घेत तुरीचे दर पाडताहेत. 
 
तूर उत्पादनात 50 टक्‍क्‍यांनी घट 
गेल्यावर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही. याचा फटका तूर पिकाला बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. गेल्यावर्षी एकरी नऊ ते दहा क्विंटल उत्पादन मिळत होते. मात्र यंदाच्या हंगामात 50 किलोच्या तीन ते चार पोत्यांचे उत्पादन मिळतेय. तुरीला दर नसल्याने या पिकाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

Web Title: Sangli News Tur purchase center issue