समान कर आकारणीमुळे हळद आवक मंदावली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

निजामाबाद, इंदूरला हळद सौदे तेजीत - ‘जीएसटी’चा संभ्रम कायम

सांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळदीचे सौद्यांचे व्यवहार जीएसटीमुळे ठप्प आहेत. हळदीवरील वाहतूक, अडत, हमाली आणि अन्य बाबींवर पाच की अठरा टक्के कर लावायचा याबाबत गोंधळ आहे.

जिल्हाधिकारी, विक्रीकर अधिकारी व जिल्हा सहकार उपनिबंधक यांच्या शनिवारी (ता. ५) होणाऱ्या बैठकीकडे नजर आहे. देशभर समान कर झाल्यामुळे  इंदूर आणि निजामाबाद येथे हळदीचे सौदे सुरू झाले आहेत. त्याचा फटका सांगलीतील हळद आवकेवर झाला आहे. 

‘जीएसटी’ची संभ्रमावस्था न संपल्याने परप्रांतातून  येणाऱ्या मालाची आवकही थांबली. आंध्रप्रदेश, कर्नाटकातून होणारी आवक थंडावली आहे. त्या ठिकाणीही आता विक्रीव्यवहार होत आहे. यापूर्वी सांगली बाजार समितीचे कर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा  ओढा सांगली बाजार समितीकडे होता. आता देशभर समान कर आकारणीमुळे त्याचा फटका सांगली बाजार समितीला बसत आहे. 

केंद्राने एक जुलैपासून जीएसटी कर लागू केला. ‘जीएसटी’बद्दल शेतकरी व व्यापाऱ्यांत संभ्रमावस्था  आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळद, गुळाची आवक व विक्रीवर परिणाम झाला. मार्केट यार्डात दररोज दहा हजार हळद पोत्यांची आवक होते. विक्री बंद असल्याने आवक थांबल्याचे चित्र होते. 

हळदीच्या किमतीवर पाच टक्के कर लागू करण्यात  आला. लेव्हीवर पाच की अठरा टक्के कर लागणार याबाबत गोंधळ आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांकडे शेतमाल उपलब्ध आहे, मात्र तो विकण्याची अडचण निर्माण झाली आहे.

ॲप, सौद्याचे उद्‌घाटन लांबणीवर 
बाजार समितीत बेदाण्याचे ऑनलाईन सौदे प्रारंभ आणि शेतकरी ॲपच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ४) मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार होता. मात्र विधिमंडळ अधिवेशनामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.

Web Title: sangli news turmeric inward slowdown due to the same taxation