घरफोडी, जबरी चोरीतील दोघे कुपवाडला जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

कुपवाड - घरफोडीसह जबरी चोरीतील दोघा अट्टल गुन्हेगारांना कुपवाड औद्योगिक पोलिसांनी आज जेरबंद केले. राजू हुसेन मुल्ला (वय ४०, रा. आंधळी, ता. पलूस) व राकेश पंडित पुजारी (वय ३०, रा. वाल्मीकी आवास, सांगली) अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून चाकू, एअरगन, मोबाईल आणि दुचाकी जप्त केली आहे.

कुपवाड - घरफोडीसह जबरी चोरीतील दोघा अट्टल गुन्हेगारांना कुपवाड औद्योगिक पोलिसांनी आज जेरबंद केले. राजू हुसेन मुल्ला (वय ४०, रा. आंधळी, ता. पलूस) व राकेश पंडित पुजारी (वय ३०, रा. वाल्मीकी आवास, सांगली) अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून चाकू, एअरगन, मोबाईल आणि दुचाकी जप्त केली आहे. दरम्यान, त्या दोघांचे साथीदार पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गस्तीवर असताना अहिल्यानगर चौकात राजू आणि  राकेश संशयास्पदरीत्या दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी त्या दोघांची चौकशी केली. त्यावेळी त्या दोघांकडे चाकू आणि एअरगन 
मिळाले. त्यामुळे पोलिसांना संशय वाढला. कसून चौकशी केली असता, त्या दोघांनी कुपवाड, मिरज परिसरात घरफोडी व जबरी चोरी  केल्याची कबुली दिली. त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी पोलिसांनी केली.

त्यावेळी कर्नाळ रोडलगतच्या एका शेतात लपवलेली एअरगनही त्यांनी दिली. या एअरगनच्या माध्यमातून चोरी करत असल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्यांच्याकडून दुचाकी, मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त केला. दरम्यान, त्या दोघांचे साथीदार पसार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. उपाधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार प्रवीण यादव, नितीन मोरे, कृष्णा गोंजारी, इंद्रजित  चेळकर यांनी कारवाई केली. 

टोळीवर सात गुन्हे
राजू मुल्ला, राकेश पुजारीसह चार जणांनी कुपवाड-मिरजे परिसरात दहशत माजवली होती. चाकू आणि एअरगनच्या माध्यमातून लोकांना दहशत दाखवत होते. कुपवाड परिसरात बुधगाव रस्त्यावर एकास अडवून त्यांची  दुचाकी व १५०० रुपयांची चोरी केली. त्यानंतर अजिंक्‍यनगर येथे चाकूचा धाक दाखवत १५ हजार, कानडवाडी (ता. मिरज) येथील ओढ्यात एकास जखमी, तानंग फाट्यावर एक लाखांची लूट, कुपवाड-मिरज रस्त्यावर चाकूच्या धाक दाखवून दागिन्यांसह २४ हजारांचा मुद्देमाल, कुमठे फाट्यावर दुचाकीसह ५५ हजारांची चोरी, मिरजेत ४ हजार ४०० रुपयांची चोरी या टोळीने केली आहे. त्या टोळीतील दोघांची नावे पोलिसांसमोर आली असून त्यांचा शोध सुरू आहे. 
...

Web Title: Sangli News two arrested in Robbery case in Kupwad