सांगलीत दोन तडीपार गुंडांना अटक

बलराज पवार
शुक्रवार, 20 जुलै 2018

सांगली - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तडीपार करण्यात आलेले गुंड शहरातच फिरत असल्याचे समोर येत असून गुंडा विरोधी पथकाने प्रशीक कांबळे (वय 22, रा. उल्हासनगर, कुपवाड) आणि टोल्या ऊर्फ प्रफुल्ल
पोतदार (वय 28, रा. खणभाग, कणसे गल्ली) या तडीपार केलेल्या दोघा गुंडांना शहरात फिरताना अटक केली आहे.

प्रशीक ऊर्फ हणमंत आनंदा कांबळे याला सहा महिन्यांसाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्याला तडीपार केले होते.
मात्र तो कुपवाड परिसरात फिरत असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली होती. पेट्रोलिंग करत असताना तो कुपवाड परिसरात दिसून आला. त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे. ही
कारवाई गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक संतोष डोके, महेश आवळे, शंकर पाटील, मेघराज रुपनर, सचिन कुंभार, योगेश खराडे, सागर लवटे, प्रफुल्ल सुर्वे यांनी केली.

खणभागात राहणार प्रफुल्ल ऊर्फ टोल्या पोतदार याला सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्याच्यावरही गंभीर गुन्हे नोंद आहेत. तडीपार असतानाही तो शहरातच फिरत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्याच्यावर पाळत ठेवून शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या पथकाने त्याला अटक केली.

Web Title: Sangli News two arrested in Sangli