पंढरपुरातील दोघांना मिरजेत अटक

संतोष भिसे
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मिरज -  बसस्थानकानजिक असणाऱ्या उत्तमनगरमध्ये काल रात्री साडे अकराच्या सुमारास संशयस्पदरित्या वावरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. प्रविण उर्फ तात्या देवीदास शिंदे ( वय 47 ) आणि अमोल दिलीप शिंदे ( वय 26, दोघेही रा. अनिलनगर झोपडपट्टी, पंढरपूर ) अशी या दोघांची नावे आहेत.

मिरज -  बसस्थानकानजिक असणाऱ्या उत्तमनगरमध्ये काल रात्री साडे अकराच्या सुमारास संशयस्पदरित्या वावरणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. प्रविण उर्फ तात्या देवीदास शिंदे ( वय 47 ) आणि अमोल दिलीप शिंदे ( वय 26, दोघेही रा. अनिलनगर झोपडपट्टी, पंढरपूर ) अशी या दोघांची नावे आहेत. महात्मा गांधी चौक पोलिसांनी  ही कारवाई केली. 

या दोघांकडे एक कट्यार आणि एक कोयता अशी हत्यारे सापडली आहेत. तसेच त्यांच्याकडील पाच लाख रुपये किंमतीची मोटारही पोलिसांनी ताब्यात घेतली. बंदी आदेश असतानाही घातक हत्यारे बाळगल्याप्रकरणी गांधी चौक पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील तात्या शिंदे याच्यावर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात 2014 ते 2016 या तीन वर्षांत पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनी हल्ला, लुटमार, शस्त्राचा धाक दाखवणे, चोरी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. 

Web Title: Sangli News two criminals arrested in Miraj