अंकली फाट्याजवळ एसटीला डंपरची धडक, दोन जखमी

बलराज पवार
बुधवार, 20 जून 2018

सांगली - सांगली कोल्हापूर रोडवर अंकली फाट्याजवळ डंपरने एसटी बसला  जोरदार धडक दिली. यामध्ये एसटीची समोरची काच फुटली तसेच इतर नुकसान झाले आहे. यामध्ये दोन प्रवासी जखमी झाले. 

सांगली - सांगली कोल्हापूर रोडवर अंकली फाट्याजवळ डंपरने एसटी बसला  जोरदार धडक दिली. यामध्ये एसटीची समोरची काच फुटली तसेच इतर नुकसान झाले आहे. यामध्ये दोन प्रवासी जखमी झाले. 

इचलकरंजीहून सांगलीकडे एसटी येत होती. एसटीमध्ये 51 प्रवासी होते. आज दुपारी बाराच्या सुमारास अंकली फाट्याजवळ एसटी आली असताना समोरून एक डंपर भरधाव वेगात आला. तो अंकली फाट्यावरून मिरजेकडे वळला. त्यावेळी त्याची समोरून आलेल्या एसटीला जोरदार धडक बसली. यात एसटीची समोरची काच फुटली. या अपघातामध्ये एसटीतील दोन प्रवासी जखमी झाले. एसटीचे ३५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Sangli News Two injured in an accident near Ankali Phata