उज्वल निकम कोथळे खून प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सांगलीत

विजय पाटील
गुरुवार, 26 एप्रिल 2018

सांगली -  विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे सांगलीत दाखल झाले आहेत. यावेळी निकम हे बहुचर्चित अनिकेत कोथळे खून प्रकरणाची माहिती घेणार आहेत. खानापूर येथील हिवरे येथील तिहेरी खून खटल्याच्या सुनावणीसाठी  उज्वल निकम सांगलीत आले आहेत.

सांगलीतील बहुचर्चित अनिकेत कोथळे खून प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आलेल्या श्री. निकम  यांनी आज कोथळे कुटुंबीयांनी भेट घेतली. यावेळी तब्बल 10 मिनिटे निकम आणि अनिकेत कोथळे यांचे भाऊ यांच्यात खटल्याबाबत चर्चा झाली. यावेळी अनिकेतला न्याय द्या अशी मागणी अनिकेतच्या भावांनी निकम यांच्याकडे केली. 

सांगली येथे  बोलताना त्यांनी आसाराम बापूच्या शिक्षेचे समर्थन करत स्वतःला संत म्हणतात, महात्मा म्हणतात अशांनी असे वागले तर काय शिकायचे असा प्रश्न उपस्थित होतो. ते पुढे म्हणाले न्याय हा सर्वाना सारखा आहे.  कोणी कितीही मोठा असु दे. संजय दत्त बाँम्बस्फोट प्रकरणात तुरुंगात गेला होता नेता असो की अभिनेता न्याय हा सर्वाना सारखाच आहे,  असेही निकम यांनी स्पष्ट केले.

Web Title: Sangli News Ujjwal Nikam in Sangli for Hirve Murder case