आता वापरा नॅपकीन बुके

संतोष भिसे
मंगळवार, 26 जून 2018

मिरज - गावोगावी जोरदार सत्कार सोहळे होतात, सभासमारंभ आणि लग्नसोहळे रंगतात. हारतुऱ्यांचा पाऊस पडतो. सभागृह रिकामे होताच मागे उरतात हारांचे-फुलांचे ढिगारे, रंगीबेरंगी फुलांनी बनवलेल्या देखण्या बुकेंचे अवशेष. शेकडो रुपये देऊन घेतलेले बुके अवघ्या तासाभरात कचरा कुंडीत  जातात. ते पाहून मनाला रुखरुख लागल्याविना राहत नाही. यावर नॅपकीन बुकेंचा सुंदर उपाय बाजारात आला आहे. 

मिरज - गावोगावी जोरदार सत्कार सोहळे होतात, सभासमारंभ आणि लग्नसोहळे रंगतात. हारतुऱ्यांचा पाऊस पडतो. सभागृह रिकामे होताच मागे उरतात हारांचे-फुलांचे ढिगारे, रंगीबेरंगी फुलांनी बनवलेल्या देखण्या बुकेंचे अवशेष. शेकडो रुपये देऊन घेतलेले बुके अवघ्या तासाभरात कचरा कुंडीत  जातात. ते पाहून मनाला रुखरुख लागल्याविना राहत नाही. यावर नॅपकीन बुकेंचा सुंदर उपाय बाजारात आला आहे. 

बुकेमध्ये नैसर्गिक फुलांऐवजी नॅपकीन तथा छोट्या टॉवेलची फुले तयार करून वापरली जातात. पाहताक्षणी मोहवणारे नॅपकीन बुके अत्यंत माफक किमतीला मिळतात. पंचवीस रुपयांपासून हजारभर रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. सत्कारानंतर घरी वापरता येत असल्याने मागणीही वाढली आहे. सत्कारानंतर पाहुण्यांनी आपला बुके सोबत नेला याचे समाधान 
संयोजकांना मिळाल्याविना रहात नाही.  

कोल्हापूर जिल्ह्यात आणि विशेषतः वस्त्रनगरी इचलकरंजीत काही उद्योजक असे कल्पक बुके तयार करतात. रंगीबेरंगी नॅपकीनला फुलांचे आकार दिले जातात. प्लास्टिक कागदात पॅक करून देखणा बुके तयार केला जातो. अत्यंत कमी वेळात तयार होणारा बुके वर्षभरही सहज टिकतो. खपले नाहीत तरी नुकसानीची काळजी नाही. नॅपकीन बाजूला काढून सुट्या स्वरूपातही विकता येतात. 

बचत गटांसाठी रोजगार ः रोकडे
मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल रोकडे म्हणाले,‘‘नॅपकीन बुकेंच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी हक्काचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. घाऊक दरात नॅपकीन घेऊन देखणे बुके तयार करता येतील. सभासमारंभांच्या निमित्ताने चांगली बाजारपेठही उपलब्ध आहे. फुलांप्रमाणे खराब होण्याचा धोका नसल्याने नुकसानीची काळजी अजिबात नाही. तालुक्‍यातील काही बचत गटांसाठी या अनोख्या व्यवसायाचा विचार आम्ही करत आहोत.

बुकेंसाठी खास रंगीबेरंगी नॅपकीन तयार केले जातात. विशेष मेहमान असेल तर त्याच्यासाठी सहा ते आठ नॅपकीन वापरून मोठा आणि आकर्षक बुके तयार केला जातो. अवघ्या चार-पाचशे रुपयांत तो मिळतो. अनेक ठिकाणी प्रमुख पाहुण्यांव्यतिरिक्त इतरांना गुलाबाची फुले दिली जातात; त्यासाठी नॅपकीनचे गुलाबही अवघ्या वीस-पंचवीस रुपयांत उपलब्ध आहेत.

कचरानिर्मिती शून्य
सत्कारानंतर बुके घरी नेले जात असल्याने कचरानिर्मिती अजिबात होत नाही. व्यवसायासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसल्याने घरोघरी बुके तयार करता येऊ शकतात. 
 

Web Title: Sangli News use Napkin Bookie