५६ कोटी परतीच्या ठेवीचे काय? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

सांगली - वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात केलेल्या परतीच्या ५६ कोटी रुपयांच्या ठेवी, त्यावरील व्याजाचे भवितव्य काय? असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. वसंतदादा कारखाना श्री दत्त इंडियाला भाडेपट्ट्याने देताना या परतीच्या ठेवीचा उल्लेखच केलेला नाही. परिणामी, जिल्हा बॅंकेने याबाबत हात वर केले आहेत. याबाबत शेतकरी संघटना न्यायालयात गेली आहे. 

सांगली - वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात केलेल्या परतीच्या ५६ कोटी रुपयांच्या ठेवी, त्यावरील व्याजाचे भवितव्य काय? असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. वसंतदादा कारखाना श्री दत्त इंडियाला भाडेपट्ट्याने देताना या परतीच्या ठेवीचा उल्लेखच केलेला नाही. परिणामी, जिल्हा बॅंकेने याबाबत हात वर केले आहेत. याबाबत शेतकरी संघटना न्यायालयात गेली आहे. 

कारखान्याला १९९५ पासून उतरती कळा लागली. कारखान्याने विविध विकास निधीसह रीतसर शेतकऱ्यांच्या बिलातून परतीच्या ठेवीही कपात केल्या होत्या. सन १९९२-९३ पासून सन २००६ च्या वार्षिक ताळेबंदापर्यंत ५६ कोटी २ लाख रुपये शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात केले आहेत. विशेष म्हणजे त्या रकमेवर साखर कारखान्याने सभासदांना चार वर्षे व्याजही दिले. वसंतदादा कारखान्याच्या शेअर्सपूर्तीसाठीही या ठेवीतील काही रक्कम वर्ग करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत झाला. नेमकी किती रक्कम आणि किती सभासदांच्या नावावर वर्ग करून घेतली, याचीही माहिती प्रशासनाकडून मिळत नाही. प्रशासनाकडून परतीच्या  ठेवीची रक्कम शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नावावर वर्ग केल्याचे यापूर्वी सांगितले. प्रत्यक्षात ती तशी रक्कम वर्ग करून घेता येत नाही, हे प्रत्येक वर्षीच्या कारखाना अहवालाच्या लेखा  परीक्षणात दाखवण्यात आले आहे. तरीही ही रक्कम सभासदांना देण्याबाबत ‘वसंतदादा’ प्रशासनाने विचार केलेला नाही. 

वसंतदादा कारखाना श्री दत्त इंडियाकडे दहा वर्षे कराराने चालवण्यास दिला आहे. आता शेतकरी, सभासदांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. दत्त इंडियाने वसंतदादाच्या देण्यातील बऱ्यापैकी रकमा दिल्या आहेत किंवा द्यायची तयारीही दाखवल्याने या आशा अधिक वाढल्या आहेत. दत्त इंडियाने हंगामात गाळपासाठीची जोरदार तयारी केली आहे. दत्त इंडिया कंपनीने आतापर्यंत सुमारे ९५ कोटींची गुंतवणूक केलीय. थकीत ऊस बिलासह कामगारांना पगारासाठी ९ कोटी २९ लाख, जिल्हा बॅंकेकडे ६० कोटी रुपयांची अनामत भरली आहे. तोडणी, वाहतूक करारासाठी सुमारे ५ कोटी, दुरुस्तीसाठी १२ ते १४ कोटी रुपये खर्च केलेत. निवृत्त कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढल्यानंतर त्यांच्याही देण्याबाबत श्री दत्त इंडिया प्रशासनाने त्यांच्याशी बोलणी सुरू केली आहेत. आता कारखाना सुरू होण्यासह परतीच्या ठेवी देण्यासाठी कंपनी प्रशासनाने सकारात्मक चर्चा सुरू करावी, अशी अपेक्षा आहे.

Web Title: sangli news Vasantdada Farmer Co-operative Sugar Factory