कोल्हापूरच्या तरुणाची कौस्तुभविरोधात तक्रार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

सांगली - मलेशियात हॉटेलमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याबद्दल कौस्तुभ पवारविरोधात शहर पोलिस ठाण्यात कोल्हापूरचा तरुण विशाल चव्हाण याने खोटे वर्क परमिट देऊन फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. 

सांगली - मलेशियात हॉटेलमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याबद्दल कौस्तुभ पवारविरोधात शहर पोलिस ठाण्यात कोल्हापूरचा तरुण विशाल चव्हाण याने खोटे वर्क परमिट देऊन फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. 

चव्हाणने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. त्याला श्रीशैल्य भोसले नावाच्या व्यक्तीने कौस्तुभ पवारची भेट येथील लक्ष्मी हॉटेलमध्ये घालून दिली होती. पवारने त्याला मलेशियात ब्ल्यू ग्रीन नेटवर्क कंपनीत ओळख असून तुला मलेशियात चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी दीड लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. 

कौस्तुभने विशालला जुलै २०१७ मध्ये लक्ष्मी हॉटेल येथे बोलवले. त्या वेळी त्याला विशालने ५०हजार रुपये दिले. त्यानंतर ६० हजार रुपये त्याच्या बॅंक अकौंटमध्ये आरटीजीएसद्वारे जमा केले. उर्वरित ४० हजार रुपये मलेशियातील एजंट प्रकाशराज (जीवा) याला देण्यास सांगितले. त्यानंतर विशालला टुरिस्ट व्हिसावर मलेशियाला पाठवण्यात आले. विशालने तेथे प्रकाश राज याला ४० हजार रुपये दिले आणि वर्किंग व्हिसाची मागणी केली. 

Web Title: Sangli News Visa Fraud issue