वाळवा आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीला दहा लाखांचा निधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

वाळवा - येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकासासाठी दहा लाखांचा निधी मंजूर आहे. त्यातून आरोग्य केंद्राच्या इमारतीची संपूर्ण दुरुस्ती करण्यात येईल. ही माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या सभापती डॉ. सुषमा नायकवडी यांनी दिली. 

वाळवा - येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकासासाठी दहा लाखांचा निधी मंजूर आहे. त्यातून आरोग्य केंद्राच्या इमारतीची संपूर्ण दुरुस्ती करण्यात येईल. ही माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या सभापती डॉ. सुषमा नायकवडी यांनी दिली.

आरोग्य केंद्राच्या इमारतीची पडझड झाल्याचे वृत्त सकाळमध्ये प्रसिध्द झाले होते. डॉ. नायकवडी म्हणाल्या, "" दहा लाखांच्या निधीतून आरोग्य केंद्राची इमारत आंतर्बाह्य दुरुस्त करण्यात येईल. त्याशिवाय इतर पायाभूत सुविधांची उभारणी करण्याचा प्रयत्न आहे.''

सुमारे सत्तर हजार रुग्णांचे आरोग्य या आरोग्य केंद्राशी निगडीत आहे. गेल्या काही वर्षांपासून आरोग्य केंद्रात अपुऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी समस्या आहे. ही परिस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे आरोग्य केंद्राच्या इमारतीचही ठिकठिकाणी पडझड सुरु झाली आहे. मुख्य व्हरांडा, नेत्ररोग विभाग, रक्ततपासणी विभाग व इतर ठिकाणी फरशा खचल्या आहेत. त्याशिवाय शिवकालीन पाणी साठवण यंत्रणाही निकामी झाली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राकडे रुग्णांचा ओढा कमी होत आहे. या कामाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशा स्वरुपाचे वृत्त सकाळ ने प्रसिध्द केले होते. त्या पार्श्‍वभुमीवर सभापती डॉ. सुषमा नायकवडी यांनी आरोग्य केंद्राच्या इमारत दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. या आरोग्य केंद्राची इमारत व तेथील दालने मंत्रालयातील दालनाप्रमाणे उभारण्यात आली आहेत. मात्र दुर्लक्षामुळे त्याची नासधूस झाली आहे.

Web Title: Sangli News Walava health care center repair