वारणा बचाव कृती समितीची बागणीत बैठक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

बागणी - वेळ पडली तर रस्त्यावर उतरु पण आमच्या हक्काचे पाणी इतर कोणाला देणार नाही असा इशारा सरपंच संतोष घनवट यांनी येथे झालेल्या बैठकीत दिला. येथे वारणा बचाव कृती समितीची बैठक झाली. 

बागणी - वेळ पडली तर रस्त्यावर उतरु पण आमच्या हक्काचे पाणी इतर कोणाला देणार नाही असा इशारा सरपंच संतोष घनवट यांनी येथे झालेल्या बैठकीत दिला. येथे वारणा बचाव कृती समितीची बैठक झाली. 

समितीचे कार्यकर्ते शरद पाटील म्हणाले, "" इचलकरंजी शहरासाठी जी अमृत योजना मंजूर केली आहे, त्या योजनेसाठी वारणाकाठच्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. वारणा काठच्या 230 गावांपैकी फक्त 79 गावांतच स्वतःच्या हक्काचे पाणी पिण्याची सोय आहे. 160 गावांचा पाण्याचा प्रश्‍न प्रलंबीत आहे. असे असून सुध्दा शासनाने या योजनेस मंजुरी दिली आहे. त्याच बरोबर या योजनेसाठी 4 हजार अश्‍वशक्तीच्या मोटारीने 24 तास हा उपसा होणार आहे. त्यामुळे ही योजना आम्ही कदापी होऊ देणार नाही. योजना वेळीच बंद न केल्यास होणाऱ्या आंदोलनास शासन जबाबदार असेल.''

लक्ष्मणराव माळी, ग्रामपंचायत सदस्य सागर गायकवाड, सतीश थोरात, मारुती शिंदे, हैदर नायकवडी, जगन्नाथ पाटील, रंगनाथ पाटील, रघुनाथ पाटील उपस्थित होते. 

Web Title: Sangli News Warana Water Issue