खानापूर तालुक्यात बारा गावात तीव्र पाणी टंचाई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

विटा - खानापूर तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. बारा गावात टंचाई आहे. आठ पैकी भांबर्डे व लेंगरे तलाव कोरडे ठणठणीत झाले आहेत. अन्य तलावात अजूनही पाणीसाठा आहे. टंचाई असलेल्या गावात प्रशासनातर्फे विहिरी, बोअर अधिग्रहणाचे काम सुरु आहे. भांबर्डे, लेंगरे गावांनी टॅंकरची मागणी केली आहे. 

विटा - खानापूर तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. बारा गावात टंचाई आहे. आठ पैकी भांबर्डे व लेंगरे तलाव कोरडे ठणठणीत झाले आहेत. अन्य तलावात अजूनही पाणीसाठा आहे. टंचाई असलेल्या गावात प्रशासनातर्फे विहिरी, बोअर अधिग्रहणाचे काम सुरु आहे. भांबर्डे, लेंगरे गावांनी टॅंकरची मागणी केली आहे. 

कायमस्वरुपी दुष्काळी खानापूर तालुक्‍यात दोन वर्षे लोकांना पिण्याचे व शेतीच्या पाण्याने भेडसावून सोडले. प्रशासनाने दोन वर्षे टंचाईग्रस्त गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करुन लोकांची तहान भागवली. दुष्काळी पट्ट्यातील गावांतून टेंभूचा कालवा गेल्याने सध्या पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे टंचाई थोडी सुसह्य आहे. परंतु खानापूर घाटमाथ्यावर अजूनही टेंभूची कामे अपुरी आहेत. मध्यंतरी टेंभूच्या वितरिकेच्या निविदा मंजूर झाल्यात. वितरकांची कामे पुर्ण झाल्यास घाटमाथ्यावरील पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. परंतु सद्यस्थितीला घाटमाथ्यावरील लोकांपुढे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे संकट उभे राहिले.

घाटमाथ्यावरील सुलतानगादे, हिवरे, पळशी, मेंगाणवाडी, जखीनवाडी, पोसेवाडी, बलवडी (खा), गोरेवाडी येथे तात्पुरत्या स्वरुपात बोअर, विहीरी अधिग्रहण केल्या आहेत. त्याचे पाणी लोकांना पिण्यासाठी पुरवले जात आहे. 

जोंधळखिंडी, देवनगर, सांगोले, भांबर्डे येथेही बोअर अधिग्रहण केले आहेत. परंतु पावसाळा अजून दोन महिने आहे. या गावांसह अन्य गावातही टंचाई तीव्र होणार आहे. बोअर, विहिरी अधिग्रहण केल्या असल्या तरी पाणी टंचाई लक्षात घेऊन टंचाईग्रस्त गावात टॅंकर सुरु करावेत, अशी मागणी आहे. 
हिवरे, पळशी येथे मोठ्या प्रमाणात निर्यातद्राक्ष तयार केली जातात. अन्य गावातही द्राक्षबागायतीसह अन्य बागायत क्षेत्र जास्त आहे. शेतीलाही पाणी टंचाईने ग्रासले आहे. द्राक्षबागायतदार टॅंकरने पाणी विकत घेऊन द्राक्षबागा व अन्य फळपिके जगवित असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

पाणी पातळी (द.ल.घ.फू.) 
तलाव पाणी पातळी 
भांबर्डे...........  कोरडा 
लेंगरे............. कोरडा 
वाळूज............ 86.50 
वेजेगांव......... 92.80 
भाग्यनगर..... 675.80 
ढवळेश्‍वर...... 51.00 
आळसंद....... 45.15 
पारे............  42.80 

Web Title: Sangli News water scarcity in Khanapur Taluka