येरळेच्या काठावरील गावांत भीषण टंचाई

रवींद्र माने
मंगळवार, 27 मार्च 2018

तासगाव -  तासगाव तालुक्‍यातील येरळाकाठच्या गावांत भीषण टंचाई जाणवू लागली आहे. नदीकाठावर गाव असूनही दोन दिवसआड पिण्याचे पाणी मिळत आहे. येरळा पात्रातील विहिरींची खोली तीस फुटांवर गेली आहे. पंधरवड्यात पाणी न सोडल्यास येरळाकाठची शेती वाळून जाण्याची भिती व्यक्‍त होत आहे.

तासगाव -  तासगाव तालुक्‍यातील येरळाकाठच्या गावांत भीषण टंचाई जाणवू लागली आहे. नदीकाठावर गाव असूनही दोन दिवसआड पिण्याचे पाणी मिळत आहे. येरळा पात्रातील विहिरींची खोली तीस फुटांवर गेली आहे. पंधरवड्यात पाणी न सोडल्यास येरळाकाठची शेती वाळून जाण्याची भिती व्यक्‍त होत आहे.

येरळा नदीत नियमित आरफळ, ताकारीचे पाणी सोडले जाऊ लागल्यानंतर नदीकाठच्या गावांत मोठ्या प्रमाणावर बागायत वाढली. तीन वर्षात येरळा नदीत बलवडी बंधाऱ्यापर्यंतच पाणी सोडले जात नाही. पुढे तालुक्‍यात पाणीच येत नसल्याने शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यात. पावसाळ्यानंतर येरळेत पाणीच आले नाही. येरळा पात्रातील विहिरी २५ तीस फुटांखाली गेल्या आहेत. आठ तास चालणारी पाण्याची मोटार आता तास दोन तासावर आली आहे. 

जोडकालव्यात अडथळा
येरळाकाठच नव्हे तर पात्रापासून दीड-दोन किलोमीटर अंतरावरून तासगावच्या हद्दीतून लांडघोळ ते भिलवडी रस्ता असा आरफळचा मुख्य जोड कालवा जातो. त्यालाही पाणी नाही. त्या कालव्यावरही शेकडो एकर बागायत झाली. या जोड कालव्यात पाणी सोडण्याच्या दारासमोर मुरूम टाकून बंद करण्यात आले. या भागातील शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रिया आहेत.

उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. द्राक्षछाटणीनंतर पाणी लागणार आहे. अशावेळी पाणी न मिळाल्यास हंगाम वाया जाणार आहे. ऊसासारखे पीक तर वाळून जाण्याची भिती आहे. ही स्थिती येरळा काठच्या शेतीची तर येरळा काठच्या गावांत पिण्याचे पाणी दोन दिवसाआड मिळत आहे. मागण्या, विनंत्या केल्या, आंदोलनाचे इशारे दिले तरीही राज्यकर्ते आणि पाटबंधारे अधिका-यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. शेतकरी, ग्रामस्थ थेट रस्त्यावर उतरण्याची भाषा करू लागलेत.

गेल्या महिन्यात आरफळचे पाणी येरळेत सोडण्याची मागणी झाल्यानंतर आमदार सुमनताई पाटील यांच्यासह शेतक-यांचे शिष्टमंडळ पाटबंधारे अधिका-यांने भेटले. अवघे दोन दिवस पाणी सोडले. ते पुन्हा बंद करण्यात आले. शेतक-यांची चेष्टा अशी, की आरफळचे पाणी वेगवेगळया मार्गाने ओढयातून सोडले. मात्र येरळा पात्रात आल्यानंतर काही फुट पाणी पुढे जावून २४ तासात बंदही झाले. आता तर पिण्याच्या पाण्याचीही ओरड होवू लागली आहे.  
 

Web Title: Sangli News water scarcity in Yerle