परतीच्या पावसात सातत्याचा अंदाज 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

सांगली - मॉन्सूनच्या पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे, मात्र परतीचा पाऊस सातत्यपूर्ण राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने थोडा दिलासा मिळतोय. वेधशाळेसह बहुतांश इंटरनेट हवामान संकेतस्थळांनी जिल्ह्यात पुढील आठ-दहा दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवलाय. द्राक्ष, ऊसासह सर्वच पिकांसाठी आणि दुष्काळी टापूत पिण्याच्या पाण्यासाठी त्याचे मोले मोठे आहे. 

गेल्या दोन दिवसांतील पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थोडे हायसे केले आहे. हा पाऊस अर्थातच पुरेसा नाही. भूगर्भातील पाणीसाठा वाढणे, हेच आता महत्वाचे आहे. त्यासाठी सातत्याने पाऊस झाला पाहिजे. जिल्ह्याच्या दुष्काळी टापूत परतीचा पाऊसच दमदार होतो, असा इतिहास आहे. यंदा जिल्हाभर मॉन्सून कोसळलाच नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला परतीच्या पावसाची आस आहे. पुढील आठ-पंधरा दिवस जिरवणीचा पाऊस झाल्यास विहिरी, कुपनलिकांतील पाणीसाठी वाढेल, अशी अपेक्षा आहे. शिवाय, जिल्हाभरातील बंधारे, शेततळी भरणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. 

फळछाटणी गतीने 
द्राक्षाची फळछाटणीचा हंगाम गेल्या काही वर्षांत एक महिना अलिकडे म्हणजे सप्टेंबरकडे सरकला आहे. सध्या फळछाटणीला गती येत आहे. चांगला पाऊस सुरु राहिल्यास तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ या प्रमुख द्राक्ष उत्पादक तालुक्‍यांत धामधुम सुरु होईल. सुदैवाने येथे कालव्याचे पाणी सुरु झाल्याने दिलासा मिळाला असला तरी पाऊस अत्यावश्‍यक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

ऊस तरेल 
ऊसाची नवी लागण, खोडवे, निडवे सारेच पीक सध्या धोक्‍यात आहे. विशेषत- टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात यंदा मोठ्या प्रमाणात ऊस लागवड झाली आहे. तेथील ऊस जळून जाईल, अशी गंभीर स्थिती निर्माण झाली होती. दोन दिवसांतील पावसाने थोडा दिलासा मिळाला आहे. अर्थात, भूगर्भातील पाणी साठा वाढण्यासाठी भरपूर पावसाची प्रतिक्षा आहे. 

Web Title: sangli news weather rain