"सील' केलेल्या बारला दारू पुरवणारे "रॅकेट' कार्यरत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

सांगली - राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूरच्या भरारी पथकाने काल माधवनगर येथे देऊन दोन हॉटेलमधील दारूसाठा जप्त केला. दोन्ही हॉटेलचा दारूचा परवाना रद्द असतानाही ते राजरोसपणे विक्री करत होते. कारवाईनंतर दोन्ही ठिकाणी शंभरफुटी रस्त्यावरील "अण्णा' दारू पुरवत असल्याची माहिती पथकाला मिळाली. अण्णाला ताब्यात देखील घेतले. परंतु कारवाईविना सोडून दिले. पाचशे मीटरच्या हद्दीतून ज्यांची दुकाने वाचली त्यांची बरकत वाढली आहे. त्याचबरोबर "अण्णा' सारख्या काहींनी अवैध दारू तस्करीचे "रॅकेट' सुरू केले आहे. त्यांच्यावर कारवाई केव्हा होणार? असा प्रश्‍न आहे. 

राज्य व राष्ट्रीय महामार्गावर पाचशे मीटर अंतरात दारू विक्री बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आदेशानंतर जिल्ह्यातील 80 टक्के दारू दुकाने, परमिट रूम, बीअर बार, बीअर शॉपींना सील करण्यात आले. त्यामुळे पाचशे मीटरच्या अंतरातून ज्यांची दुकाने, बार वाचले त्यांचा धंदा सध्या तेजीत आहे. काहींनी तर जादा दराने दारू विक्री सुरू केली आहे. त्याचबरोबर बंद पडलेल्या बार, परमिट रूमना चोरी छुपे दारू पुरवण्याचा ठेका काहींनी घेतला आहे. 

न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी दोन महिने सातत्याने छापे टाकून मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा जप्त केला. संबंधितांवर गुन्हे दाखल केले. मात्र कारवाईची प्रमुख जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने फारशी कारवाई केली नाही. बंदी आदेशानंतरही जिल्ह्यात अनेक ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंटच्या नावाखाली दारू विक्री जोमात आहे. तसेच काहींनी थेट "पार्सल' विक्रीही सुरू केली आहे. त्यामुळे आदेशानंतर जेथे गर्दी होत होती तेथील गर्दी कमी झाल्याचे चित्र दिसून येते. 

सील केलेल्या अनेक बार, परमिट रूममध्ये मागील दाराने दारू विक्री केली जाते. माधवनगर येथे पोलिस चौकीसमोरच मुख्य रस्त्यावर दुर्गाप्रसाद आणि विश्‍वभारती या हॉटेलमध्ये राजरोस दारू दिली जात होती. परंतु दोन महिन्यांत तेथे कारवाई करण्याचे धाडस दाखवले नाही. अखेर कोल्हापूरच्या पथकाने तेथे येऊन छापा मारून दारूसाठा जप्त केला. शंभरफुटी रस्त्यावरील "अण्णा' दारू पुरवत असल्याची माहिती मिळाली. पथकाने "अण्णा' ला उचलले. परंतु नंतर काय झाले? कळालेच नाही. सांगली परिसरात असे अनेक "अण्णा' अवैधपणे दारूची तस्करी करत आहेत. त्यामुळे न्यायालयीन आदेशाचा अवमान होत आहे. 

Web Title: sangli news wine