तासगाव तालुक्यात महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

सांगली - कुमठे (ता. तासगाव) येथील बाळाताई माळी (वय 60) यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. त्यांना उपचारांसाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वाईन फ्लूचा जोर कायम असून, सहा जणांना स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह असल्याची माहिती शासकीय रुग्णालयातून देण्यात आली. 

स्वाईन फ्लूला सध्या पोषक वातावरण असल्याने याची साथ कायम आहे. सांगली, मिरज शासकीय रुग्णालयासह भारती हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्लूच्या संशयित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कुमठे येथील बाळाताई माळी यांना काही दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या स्वॅबचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता. 

Web Title: sangli news Woman swine flu death