महिला फौजदारास लाच घेताना आष्ट्यात अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

आष्टा - आष्टा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक तेजश्री धनाजी पवार यांना पंधरा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. महिला पोलिस अधिकारीच लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तेजश्री पवार, काकाचीवाडी बागणी येथील नोमान वठारे यांच्यावर गुन्हा नोंद झाला.

पूर्वीच्या भांडणातून २४ जून २०१८ रोजी बावची (ता. वाळवा) येथे तिघांत जोरदार मारामारी झाली. त्या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला. तेजश्री पवार यांच्याकडे तपास होता. 

पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली. त्या दोघांना मदतीसाठी तेजश्री पवार व नोमान वठारे यांनी ३० हजारांची मागणी केली. हे पैसे २७ जूनला देण्याचे नक्की झाले. संशयिताचा मावसभावाच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधकने २८ व २९ जूनला पडताळणी केली. त्यात पवार व वठारे यांनी तीस हजारांची मागणी करून पहिला टप्पा पंधरा हजार व उरलेली रक्कम नंतर अशी मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आज पथकाने सापळा रचून पहिला टप्पा म्हणून १५ हजाराची रक्कम घेताना पवार यांना पकडले.

पुणे विभागाचे पोलिस उपायुक्त संदीप दिवाण, अपर पोलिस उपायुक्त राजकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक राजेंद्र तेंडुलकर, कर्मचारी चंद्रकांत गायकवाड, सुनील राऊत, अविनाश सागर, सारिका कदम यांनी कारवाई केली.

तडकाफडकी बदल्या 
आष्ट्यातील पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाल्यानंतर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आष्टा व इस्लामपूरच्या पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. इस्लामपूरचे संदीप कोळेकर व आष्ट्यातील मिलिंद पाटील यांच्या बदल्या केल्या आहेत. इस्लामपूरला निवास साळुंखे व आष्ट्यात जमादार यांची नियुक्‍ती केल्याचे समजते.

Web Title: Sangli News women PSI arrested in bribe case in Astha