सांगलीत 'यिन'च्या विजयी उमेदवारांचा जल्लोष 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

विजय उमेदवारांची नावे अशी : विनायक सूर्यवंशी (भारती मॅनेजमेंट) 
धानेश्‍वर माळी (साळुंख कॉलेज) तौहिद मुलाणी (पतंगराव कदम) 
राजेंद्र हांडगे (चितांमणराव कॉलेज) निकीता शिंदे (गरवारे कन्या महाविद्यालय) 
अक्षय जाधव (कृषी महाविद्यालय). मिताली पवार (कन्या महाविद्यालय) लक्ष्मी पुजारी (मालती कॉलेज) 
प्राचार्य नियुक्‍त उमेदवार असे : मधुकर शेंडे (लॉ कॉलेज) सुप्रिया घोरपडे (महाडिक कॉलेज) श्रीकांत गायकवाड (वारणा महाविद्यालय)
सुरेखा पवार (राजमती कॉलेज), सत्याजित कदम (शिवाजीराव देशमुख कॉलेज)

सांगली : "यिन'च्या निवडणुकीची मतमोजणी येथील "सकाळ'च्या विभागीय कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. सकाळपासूनच तरुणाईच्या गर्दीने कार्यालय फुलून गेले होते.

या निवडणुकीच्या रिंगणात 42 उमेदवार उभे होते. यापैकी अत्यंत अटीतटीच्या लढतीत सहा उमेदवारांनी विजय संपादन केला. तर पाच उमेदवारांची निवड प्राचार्य नियुक्‍त पध्दतीने पार पडली. विजयी उमेदवारांना सहयोगी संपादक शेखर जोशी व जाहिरात व्यवस्थापक उदय देशपांडे यांच्याहस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. महापालिका क्षेत्र व जिल्ह्यातील एकूण 14 महाविद्यालयांनी या निवडणुकीत भाग घेतला होता. सर्व विजयी उमेवारातून राज्यस्तरावर पदाधिकारी निवड व शाडो कॅबिनेटची निर्मित करण्यात येणार आहे. 

मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांनी आपापल्या कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्यं व शिक्षकांची भेट घेतली व मित्रांसह जल्लोष केला. 

विजय उमेदवारांची नावे अशी : विनायक सूर्यवंशी (भारती मॅनेजमेंट) 
धानेश्‍वर माळी (साळुंख कॉलेज) तौहिद मुलाणी (पतंगराव कदम) 
राजेंद्र हांडगे (चितांमणराव कॉलेज) निकीता शिंदे (गरवारे कन्या महाविद्यालय) 
अक्षय जाधव (कृषी महाविद्यालय). मिताली पवार (कन्या महाविद्यालय) लक्ष्मी पुजारी (मालती कॉलेज) 
प्राचार्य नियुक्‍त उमेदवार असे : मधुकर शेंडे (लॉ कॉलेज) सुप्रिया घोरपडे (महाडिक कॉलेज) श्रीकांत गायकवाड (वारणा महाविद्यालय)
सुरेखा पवार (राजमती कॉलेज), सत्याजित कदम (शिवाजीराव देशमुख कॉलेज)

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Sangli news YIN election in Sangli