मिरज तालुक्यात वीजेच्या धक्‍क्‍याने तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

सांगली - कावजी खोतवाडी (ता. मिरज) येथे आज सकाळी शेतात औषध मारत असताना तुटलेल्या वीजेच्या तारांना स्पर्श होवून एक तरुण जागीच ठार झाला. तर त्याला वाचवण्यासाठी गेलेले आई-वडील जखमी झाले.

सांगली - कावजी खोतवाडी (ता. मिरज) येथे आज सकाळी शेतात औषध मारत असताना तुटलेल्या वीजेच्या तारांना स्पर्श होवून एक तरुण जागीच ठार झाला. तर त्याला वाचवण्यासाठी गेलेले आई-वडील जखमी झाले.

अभिजित रामचंद्र पाटील (वय 25) असे तरुणाचे नाव असून रामचंद्र विष्णू पाटील (वय 52) आणि राजश्री पाटील (वय 46) असे त्याच्या आई वडिलांचे नाव आहे. त्यांच्यावर शासकीय
रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सांगलीपासून सुमारे सतरा किलोमीटर अंतरावर असलेल्या कावजी खोतवाडी येथे काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याने वीजेच्या तारा तुटल्या होत्या. त्यातील एक तार रामचंद्र पाटील यांच्या शेतात पडली होती. आज सकाळी त्यांचा मुलगा अभिजित हा शेतात कीडनाशक फवारणीसाठी गेला होता. फवारणी करत असताना त्याचा पाय तुटलेल्या वीजेच्या तारेवर पडला आणि त्याला जोरदार धक्का बसला. यामध्ये तो जागीच ठार झाला.

मुलगा अचानक पडल्याचे दिसताच आई राजश्री तेथे गेल्या. त्यांनी मुलाला ओढून काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनाही धक्का बसला. पाठोपाठ आलेल्या रामचंद्र पाटील यांनीही त्यांनी हात लावला आणि त्यांनाही धक्का बसला.

त्यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक तेथे धावत आले. त्यांनी वीजेचा प्रवाह बंद करुन त्यांना बाजूला केले. तिघांनाही तातडीने सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र अभिजित ठार झाला होता. त्याच्या आई वडिलांवर उपचार सुरु आहेत.

Web Title: Sangli News Young killed by electricity in Miraj taluka

टॅग्स