मोबाईलचा नाद नडला, तो थेट विहिरीत पडला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

आटपाडी - आटपाडीचे बाजार पटांगण. शनिवारची वेळ रात्री साडेआठ. वीज गेल्याने चोहीकडे अंधार. एक राजस्थानी तरुण मोबाईलवर बोलत बोलत चाललेला असताना अंधारात अंदाज न आल्यामुळे बाजार पटांगणात मध्यभागी असलेल्या पाणी नसलेल्या २५ फूट खोल विहिरीत पडला.

किरकोळ स्वरूपाची दुखापतही झाली. तरुणाने आरडा-ओरडा केल्यावर अनेकजण गोळा झाले. त्याला विहिरीतून बाहेर काढले. विहीर गावासाठी उपयोगाची राहिलेली नाही. उलट अनेक लहान-मोठे अपघात झालेत. 

आटपाडी ओढ्यालगत बाजार पटांगणात उत्तरेश्‍वर मंदिरामागे जुनी विहीर आहे. पूर्वी विहिरीच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जात असे. कालांतराने तोही बंद झाला. पाणीही कमी झाले. आता कचरा टाकण्यासाठी वापर सुरू आहे. विहिरीला दोन फूट कठडे बांधले आहेत; मात्र चौकात असल्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झालेत.

शनिवारी एक राजस्थानी तरुण मोबाईलवर बोलत अंधारातून चालला होता. बोलण्याच्या नादात आणि अंधारात विहीर न दिसल्याने तो विहिरीत पडला. त्याने स्वतःच आरडा-ओरडा केल्यानंतर किसन पाटील, प्रसाद भिंगे, रवींद्र भिंगे, प्रमोद भिंगे, अजित भिंगे, सुनील भिंगे, महेश चांडवले आदी जमले. त्यांनी विहिरीत दोर सोडून त्याला वर काढले. विहीर तशीच वापराविना आहे. 

Web Title: sangli news youngster fell in well