पेट्रोल दरवाढीविरोधात मिरजेत युवक कॉंग्रेसचे आंदोलन 

संतोष भिसे
मंगळवार, 22 मे 2018

मिरज - पेट्रोल दरवाढीच्या विरोधात मिरज युवक कॉंग्रेसने दरवाढीच्या शुभेच्छा देऊन उपहासात्मक आनंदोत्सव साजरा केला. दरवाढीचा निषेध केला. 

मिरज - पेट्रोल दरवाढीच्या विरोधात मिरज युवक कॉंग्रेसने दरवाढीच्या शुभेच्छा देऊन उपहासात्मक आनंदोत्सव साजरा केला. दरवाढीचा निषेध केला. 

शहराध्यक्ष धनराज सातपुते म्हणाले, पेट्रोलने आत्तापर्यंतचा उच्चांकी दर गाठला आहे. सर्वसामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे, तरीही सामान्य जनता विरोध करताना दिसत नाही. हे मानसिक गुलामगिरीचे उदाहरण आहे. 

या गुलामगिरीला छेद देऊन जनजागृती करण्याची जबाबदारी युवक कॉंग्रेसने स्विकारली आहे. आज सकाळी गांधी पुतळ्याजवळ पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांना कार्यकर्त्यांनी पेट्रोल दरवाढीच्या उपहासात्मक शुभेच्छा दिल्या. गुलाबपुष्प दिले. पेढे, साखर वाटून उपहासात्मक आनंद साजरा करण्यात आला. 

यावेळी अध्यक्ष धनराज सातपुते, राकेश कोळेकर, सुनील शेडबाळे, डॉ विक्रम कोळेकर, योगेश जाधव, डॉ तोहीद मुजावर, मुस्तफा बुजरूक, अँड बिलकीस बुजरूक, सुजित लकडे, सुनील गुळवणे, सचिन जाधव,महंमद मणेर,नरेंद्र मोहिते, महादेव नलवडे, धीरज घस्ते, रोहित खंदारे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: Sangli News youth congress agitation on hike in Petrol Rate