खोटी माहिती देणाऱ्या शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

सांगली - शिक्षक बदल्यामध्ये संवर्ग एक व दोनमधील ज्या शिक्षकांनी खोटी माहिती देऊन बदली करून घेतली अशा शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही शिक्षक "रडार' वर आहेत. तर अशा शिक्षकांमुळे जे विस्थापित झाले असतील, त्यांना मूळ जागी नियुक्ती देण्याचे आदेशही दिले आहेत.

शिक्षकी पेशा हा उदात्त पेश असून, भावी पिढी घडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे शिक्षक बनावट प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे सादर करणार नाहीत अशी अपेक्षा शासनाला होती. तरीही संवर्ग एक व दोनमधील अनेक शिक्षकांनी खोटी माहिती सादर करून बदल्या करून घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. खोटी माहिती सादर करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी विस्थापितांनी केली होती. त्यामुळे कारवाईचा निर्णय घेतला.

संवर्ग एक व दोनमधील शिक्षकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे सादर केली आहेत, त्याची तत्काळ पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. ही पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून शिक्षकांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. पडताळणीचे काम जिल्हा परिषद प्रशासनाने 10 जुलैपर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. पडताळणीमध्ये शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून दिल्याचे आढळल्यास संबंधित शिक्षकावर कारवाई करावी. सदर शिक्षकाची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करावी असेही आदेश दिले आहेत.

खोट्या माहितीच्या आधारे बदली करून घेतलेल्या शिक्षकांमुळे जे विस्थापित झाले आहेत, त्यांना न्याय देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

..तर विस्थापित मुळ जागी -

खोटारड्या शिक्षकांमुळे ज्या विस्थापितांना "रॅन्डम राऊंड' मध्ये बदली मिळाली असेल त्यांना मूळ जागी नियुक्ती दिली जाईल. तर खोटारडे विस्थापितांच्या जागी जातील. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्याचे अधिकार दिले आहेत. विस्थापितांना विनंतीनुसार बदली मिळाली असेल तर खोटी माहिती देणारे पुढीलवर्षी थेट "रॅन्डम राऊंड' मध्ये बदलीने जातील.

Web Title: Sangli News ZP Rural Development decision